नवी दिल्ली,
West Bengal voter turnout पश्चिम बंगाल विधानसभेच्या 142 मतदारसंघात 29 एप्रिलला दुसèया टप्प्यात विक्रमी म्हणजे 92.67 टक्के मतदान झाले. महत्वाचे म्हणजे राज्यातील 22 मतदारसंघात 95 टक्क्याच्यावर मतदान झाल्याचे वृत्त आहे.
राज्यात दोन्ही टप्प्यातील मतदानाची संयुक्त टक्केवारी 92.93 टक्के आहे. आतापर्यंत विधानसभेसाठी झालेली देशातील कोणत्याही राज्यातील मतदानाची ही सर्वाधिक टक्केवारी आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्याच्या मिनाखां मतदारसंघात तर रेकॉर्डतोड म्हणजे 97.77 टक्के मतदान झाले आहे. देशातील अन्य राज्यात लोकसभा असो की विधानसभा निवडणूक मतदानाची सरासरी टक्केवारी 60 ते 70 टक्क्याच्या वर जात नसतांना पश्चिम बंगालमधील मतदानाची विक्रमी टक्केवारी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे.
यावेळी राज्यात विक्रमी म्हणजे 90 टक्क्याच्यावर मतदान झाले असले तरी राज्यात आतापर्यंत होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुका असो की विधानसभेच्या मतदानाची टक्केवारी ही नेहमीच 80 टक्क्याच्या वर राहिलेली आहे. 1996 मध्ये राज्यात पहिल्यांदा लोकसभेसाठी 82.66 टक्के मतदान झाले होते. त्याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदानाची टक्केवारी 82.94 टक्के होती. त्याच्या आधीच्या सर्व निवडणुकीत राज्यातील मतदानाची टक्केवारी 80 टक्क्याच्या आता राहात होती.
1998 च्या लोकसभा West Bengal voter turnout निवडणुकीत पश्चिम बंगालमधील मतदानाची टक्केवारी 79.27 टक्के होती. 1999 च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75.05 टक्के होती. 2001 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत 75.29 टक्के मतदान झाले होते. 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 78.04 टक्के मतदारांनी मताधिकार बजावला होता.2006 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 81.58 टक्के मतदानाची टक्केवारी होती. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत 81.42 टक्के मतदान झाले होते.
2011 च्या विधानसभा West Bengal voter turnout निवडणुकीत 84.72 टक्के मतदान झाले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 82.22 टक्के मतदारांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले होते. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत 83.02 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 81.76 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत 82.30 टक्के मतदारांनी मताधिकार बजावाला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 79.55 टक्के मतदारांनी मतदान केले होते. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत दोन टप्प्यात मिळून 92.67 टक्के मतदारांनी मतदान करत आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे प्रदर्शन केले होते. याचाच अर्थ राज्यात प्रत्येक निवडणुकीत 80 टक्क्याच्यावर मतदान याआधीच्या अनेक निवडणुकांत झाले आहे. यावेळी मतदानात दहा ते बारा टक्क्यांनी वाढ झाली एवढेच. यावेळची ही वाढ कमी नाही तर देशात नवा विक्रम घडवणारी आहे, हे नक्की. मतदानासाठी बंगालची जनता जो उत्साह दाखवतो, तो देशातील अन्य राज्यातील मतदारांनीही दाखवणे अपेक्षित आहे.