८०टक्के पाकिस्तानी लोक समलिंगी!

पाकिस्तानी ट्रान्सजेंडरचा खळबळजनक दाव

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
इस्लामाबाद,
80 percent of Pakistanis are gay पाकिस्तानातील ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या हीना बलोचच्या खळबळजनक विधानामुळे देशात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये हीनाने दावा केला आहे की, ८० टक्के पाकिस्तानी समलिंगी आहेत आणि उर्वरित २० टक्के उभयलिंगी आहेत, म्हणजे त्यांचे पुरुष आणि स्त्रिया दोघांशीही शारीरिक संबंध असतात. तिच्या मते, पाकिस्तानातील सामाजिक, धार्मिक आणि कौटुंबिक दबाव इतका तीव्र आहे की अनेक लोक आपल्या खऱ्या लैंगिकतेबद्दल मोकळेपणाने बोलू शकत नाहीत.
 
 
 Pakistanis are gay
 
हीना बलोचच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी समाजात ही गोष्ट जणू एक उघड गुपित आहे. जरी लोक त्याबद्दल खुलेपणे बोलत नसले तरी, माझ्या मते ८० टक्के लोक समलिंगी आहेत आणि उर्वरित २० टक्के उभयलिंगी आहेत."ती पुढे म्हणाली की, पाकिस्तानात कोणीही पूर्णपणे विषमलिंगी नसल्याचे दिसून येते आणि लोक बहुधा आपली लैंगिक ओळख सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांनी लपवतात.
 
 
आपल्या बालपणीच्या अनुभवांबद्दल बोलताना हीना म्हणाली, पाकिस्तानातील लोक अनेकदा आपल्या लैंगिकतेची ओळख लपवतात. मला नेहमी ही काळजी राहायची की लिपस्टिक कशी लावावी, स्त्रीसारखी कपडे कसे घालावे आणि कुटुंबाकडून येणाऱ्या टोमण्या कशा टाळाव्यात. हीना बलोचने पाकिस्तानातील ख्वाजा सिरा समुदायाला भेडसावणाऱ्या अडचणींबद्दलही सांगितले. तिच्या म्हणण्यानुसार, या समुदायातील अनेक सदस्यांना भीक मागणे, नृत्य करणे किंवा लैंगिक काम करण्यास भाग पाडले जाते, जे अनेकदा शोषणकारी असते. या अडथळ्यांना तोंड देत, हीना ट्रान्सजेंडर आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी सक्रिय झाली. तिने सिंध मुरात मार्चची सह-स्थापना केली आणि पाकिस्तानच्या औरत मार्चमध्ये भाग घेतला.