उन्हाळ्यातील टंचाई टाळा, रक्तदान करा

सामाजिक संघटनांचे आवाहन आज रक्तदान शिबिराचे आयोजन

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
अकोला
Blood donation camp उन्हाळ्यात गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई जाणवू नये यासाठी आदर्श संस्कार मंडळ, भारत विकास परिषद, राष्ट्रीय विचार मंच, बेरार एज्युकेशन सोसायटी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, संस्कृती संवर्धन समिती, स्व. प्रा. लिलाधरजी राठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, विद्या भारती या संस्थांसह विविध सामाजिक सहयोगी संस्थांद्वारा रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील रालतो विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात दात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन या संघटनांद्वारा करण्यात आले.
 
blood donation 
Blood donation camp रक्त केंद्रांमध्ये विविध शिबिराच्या माध्यमातून दात्यांनी केलेल्या रक्तदानाद्वारे रक्तसाठा उपलब्ध असतो. दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताची टंचाई जाणवते. उन्हाळ्यात एकीकडे रक्ताची मागणी वाढत असताना दुसरीकडे रक्तदान शिबिराची संख्या कमी झाल्यामुळे याकाळात केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो.
Blood donation camp प्रखर उन आणि शाळा, महाविद्यालयांना असणारी सुटी यामुळे रक्तदान शिबिराची संख्या अधिकच रोडावते. पण गरजू रुग्णांना आवश्यक असणार्‍या रक्ताची गरज असतेच. हा विरोधाभास काही अंशी कमी व्हावा, रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांची रक्तासाठीची वणवण दूर व्हावी या हेतूने दरवर्षी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे आयोजन रविवार, ५ एप्रिल रोजी करण्यात आले आहे.
Blood donation camp यासाठी आदर्श संस्कार मंडळ, भारत विकास परिषद, राष्ट्रीय विचार मंच, बेरार एज्युकेशन सोसायटी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, संस्कृती संवर्धन समिती, स्व. प्रा. लिलाधरजी राठी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, विद्या भारती, डॉ. हेडगेवार रक्त केंद्र या सामाजिक संघटनांसह विविध संघटनांनी पुढाकार घेतला आहे. रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन शिबिर संयोजकांनी केले आहे.