भाजपा स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
नियोजनाच्या तयारीसाठी कार्यालयात बैठक
 
वर्धा, 
येत्या ६ एप्रिल रोजी Bjp sthapana divas भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शहर भारतीय जनता पार्टी द्वारे करण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक शुक्रवार ३ रोजी स्थानिक भारतीय जनता पार्टी कार्यालयात शहर अध्यक्ष निलेश किटे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
 

bjp dksl 
 
Bjp sthapana divas  या बैठकीला मार्गदर्शक म्हणून भाजपा ज्येष्ठ नेते जयंत कावळे, श्रीधर देशमुख, शहर अध्यक्ष निलेश किटे, नप गटनेता विलास आगे, गिरीश कांबळे, निलेश पोहेकर, संयोजक अजय पहाडे, शहर महामंत्री सौरभ देशमुख, शहर उपाध्यक्ष प्रशांत कडू, आशिष मिश्रा आणि सर्व भाजपा नगरसेवक, शहर कार्यकारिणी सदस्य, सर्व शतिकेंद्र प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते. भाजपा स्थापना दिनानिमित्त शहरात सर्व प्रमुख पदाधिकारी यांचे कार्यालय तसेच जिल्हा कार्यालयात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. वार्डावार्डात सफाई अभियान, ज्येष्ठ भाजपा नेत्यांचे संमेलन आणि सत्कार, प्रत्येक कार्यकर्त्याकडे ध्वजारोहण तसेच मुख्य कार्यालयात ध्वजारोहण, आरोग्य शिबिर आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यशस्वीतेसाठी या सर्व कार्यक्रमांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शहर अध्यक्ष निलेश किटे यांनी केले आहे.