पुनर्वसन मूल्यांकनातील त्रुटी दुरुस्तीसाठी गरमसूर ग्रामस्थांचा लढा

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
वनपरिक्षे अधिकार्‍यांकडे तक्रार
 
सेलू, 
Garamsur Village Rehabilitation तालुयातील गरमसूर येथील ग्रामस्थांनी पुनर्वसन प्रक्रियेत घर व शेतीच्या मूल्यांकनात झालेल्या गंभीर त्रुटींविरोधात आवाज उठवला आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या मूल्यांकनामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यत करत ग्रामस्थांनी हिंगणी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) रूपेश खेडकर यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून, तात्काळ दुरुस्तीची मागणी केली आहे.
 
 
garam
 
पुनर्वसनासाठी पात्र ठरणार्‍या १८ वर्षांवरील लाभार्थ्यांच्या पॅकेज व जागेच्या मूल्यांकनासाठी वनविभागाने आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, शिधापत्रिका आणि ७/१२ उतारा अशी कागदपत्रे मागवली होती. मात्र, नव्या सर्वेक्षणानुसार ७/१२ उतार्‍यात बदल झाल्याने जुने उतारे ग्राह्य धरले जात नसल्यामुळे अनेक कुटुंबे संभ्रमात सापडली आहेत. शासनाच्या बदलत्या निकषांचा फटका आम्हाला बसत आहे, अशी खंत ग्रामस्थांनी व्यत केली.
 
 
Garamsur Village Rehabilitation  याचबरोबर, ग्रामपंचायतीकडे मदतीसाठी धाव घेतली असता ग्रामसेवकांकडून विविध करांची मागणी होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. संबंधित क्षेत्र अधिसूचित झाल्याने ग्रामपंचायत बरखास्त अवस्थेत असताना हे कर नेमके कुठे आणि कोणत्या निधीत जमा होणार, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. गरमसूरमधील नागरिकांनी शासनाला थेट आवाहन करत, पुनर्वसन ही केवळ प्रक्रिया नसून आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. योग्य आणि पारदर्शक मूल्यांकन झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, अशी भूमिका मांडली आहे. दरम्यान, स्थानिक विकासाच्या दृष्टीने गरमसूर येथे सफारी गेट उभारण्यात यावे आणि सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुनर्वसन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष दिलीप सलाम, सचिव गजानन डोंगरे, सरपंच सुलेचना राऊत, सुरेश शेंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या या लढ्यामुळे प्रशासनाला जाग येणार का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.