अशोक ज्वेलर्समधून तीन तोळे सोने लंपास

    दिनांक :04-Apr-2026
Total Views |
वाशीम, 
येथील Gold stolen from Ashok Jewellers अशोक ज्वेलर्स या दुकानातून दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरांनी दुकान चालकाचे लक्ष विचलित करुन दुकानातील ड्रावरमध्ये ठेवलेले तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आज, ४ एप्रिल रोजी भरदिवसा घडल्याने सराफा व्यवसायिकामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 
 
ashnodsdskl
 
येथील सराफा बाजारात Gold stolen from Ashok Jewellers  अशोक ज्वेलर्स चे दुकान आहे. याठिकाणी दोन अज्ञात सोने घेण्याच्या निमीत्ताने दुकानात आले. त्यांनी दुकानदाराला आम्हाला सोने घ्यायचे आहे, असे म्हणून तो दागीना दाखवा हा दागीना दाखवा, असे म्हणत दुकान मालकाचे लक्ष विचलीत करुन ड्रावरमध्ये ठेवलेले तीन तोळे सोन्याचे दागीने हातचलाखीने चोरले आणि दुचाकीवरुन पसार झाले. सदर चोरटे हे सीसी कॅमेर्‍यात कैद झाले असून, याबाबत दुकान मालकाने वाशीम शहर पोस्टे ला दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाशीम शहर पोलिस करीत आहेत.