यवतमाळ,
'Nanhe Sitare' competition जिल्ह्यातील शाळांसाठी आयोजित ‘नन्हे सितारे’ स्पर्धेत यवतमाळ पंचायत समितीतील किन्ही शाळेचे 11 विद्यार्थी जिल्हास्तरावर चमकले आहेत. या स्पर्धेतील विविध अकरा प्रकारात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धेत किन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत शाळेची गुणवत्ता सिद्ध केली आहे. समग्र शिक्षा अभियान व ओपन लिंक फाऊंडेशनतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली. बक्षीस वितरण समारंभ येत्या मंगळवार, 7 एप्रिलला जिल्हा परिषद हायस्कूल यवतमाळ येथे होणार आहे.
त्यामध्ये शाळेतील सातवीतील रोहित मनोहर धानोरकर, प्रेम विजय कुमरे, यज्ञश्री गणेश चट्टे, नीता गोपाळ राठोड, नंदिनी विष्णू मिरासे, पाचवीतील सौरव बाळू तुरी, परी अनिल तलमले, चौथीतील कुमुद विजय कुलरकर, मंथन राजेश मोहरकर, तिसरीतील वैदेही मोहन तिरमारे, मुकुंद गजानन कुलरकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शिक्षक वनिता झुरळे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले. त्याबद्दल मुख्याध्यापक आशा महल्लेे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रकल्प संचालक राम हटकर यांच्या मार्गदर्शनात तीन महिन्यापासून या परीक्षेची तयारी करण्यात आली होती.
'Nanhe Sitare' competition या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व सर्जनशीलतेला वाव मिळावा म्हणून इंग्रजी विषयाचे व्हिडिओ बनवून विनोबा अॅपच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून कथाकथन, स्पेलिंग बी, कविता सादरीकरण, स्पोकन इंग्लिश, महावाचन आदी विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला.