नेर,
Ner English High School: Ideal School Award शैक्षणिक गुणवत्ता, अभिनव उपक्रम, उत्कृष्ट व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या नेरपरसोपंत येथील इंग्लिश हायस्कूलला ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तर आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Ner English High School: Ideal School Award राज्यभरामध्ये उपक्रमशीलतेने कार्य करणारे शिक्षक, उत्तम प्रशासक, उत्कृष्ट शाळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन ध्येय फाऊंडेशन सन्मानित करत असते. इंग्लिश हायस्कूलने आदर्श शाळेने सर्व निकष पूर्ण केल्यामुळे राज्य आयडॉल शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या हस्ते पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहामध्ये आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक सुरेश कनाके, विजय तंबाखे, कुणाल कुबडे, राहुल चिरडे व अमोल जाधव उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, उपप्राचार्य व पर्यवेक्षक यांनी आनंद व्यक्त केला असून या सन्मानाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.