शासनाची नुकसान भरपाई देण्याची मागणी !
मानोरा,
Unseasonal rains damage millet crops तालुयातील गिरोली परिसरात ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता आलेला वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हळदा येथील शेतकरी किशोर रतनसिंग राठोड यांच्या गिरोली शिवारातील शेत सर्व्हे नं १६५ मधील पाच एकर शेतातील उभे उन्हाळी पीक बाजरा आडवा पडल्याने अतोनात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने पाहणी व पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित कुटुंबियांच्यावतीने करण्यात आली आहे.
शेतकर्यांना नेहमीच कोणत्या न कोणत्या संकटाचा सामना करावा लागतच आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी पडलेले पिकांचे भाव मात्र आता शुक्रवारी सायंकाळचे सुमारास गिरोली शिवारात विजेचा कडकडाट वादळी वार्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हळदा येथील शेतकरी किशोर राठोड यांच्या शेतात काढणीला आलेले पाच एकरातील बाजरा पिक शेतात आडवे पडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्पादक शेतकर्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे.
Unseasonal rains damage millet crops हवामान खात्याने विविध ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीटची शयता वर्तविली होती. त्यानुसार मानोरा शहरासह तालुयात तीन दिवसापासुन ढगाळ वातावरण असतांना ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी सुध्दा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पावसाने उशिरा पेरलेल्या गव्हाचे पीक झोडपल्या गेल्याने शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याचे चित्र तालुयात पाहायला मिळाले. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बाधित कुटुंबाकडून होत आहे.