प्रेमसंबंधानंतर लग्नाच्या विराेधातून एअर हाेस्टेसची आत्महत्या

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर, 
Air hostess suicide डाॅक्टर तरुणाशी असलेल्या प्रेमसंबंधानंतर लग्न करण्यासाठी स्वतःच्या काही नातेवाईकांचा विराेध पचवू न शकल्यामुळे एका एअर हाेस्टेसने घरात गळास घेऊन आत्महत्या केली. गायत्री उर्फ गाैरी (27) असे मृत युवतीचे नाव आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाैरी ही एअर हाेस्टेसचे प्रशिक्षण पूर्ण करून एका खासगी विमान कंपनीत नाेकरी करीत हाेती. तिचे वडील हे माेठे हाॅटेल व्यावसायिक आहेत. गायत्रीचे एका डाॅक्टर तरुणासाेबत प्रेमसंबंध हाेते आणि या नात्याला तिच्या कुटुंबीयांचीही संमती हाेती. मात्र, काही नातेवाईकांचा या प्रेमविवाहास विराेध असल्याचे बाेलले जात आहे. याच कारणामुळे कुटुंबाकडून लग्नासाठी सतत दबाव वाढला हाेता, ज्यामुळे गायत्री मानसिक तणावाखाली हाेती.
 
 
sku
 
Air hostess suicide  शुक्रवारी रात्री गायत्रीचे कुटुंबीय भंडारा येथे नातेवाइकांकडे गेले असताना ती घरी एकटीच हाेती. रात्री 2 वाजता तिने आपल्या डाॅक्टर प्रियकराला फोन केला. दाेघांमध्ये लग्नाबाबत आणि हाेणाऱ्या मानसिक त्रासाबाबत चर्चा झाली. यादरम्यान गायत्री अत्यंत भावूक झाली आणि तिने फोनवरच आत्महत्येची धमकी दिली. हे ऐकताच तिचा प्रियकराने तातडीने तिच्या घराकडे धाव घेतली. त्याने बराच वेळ दरवाजा ठाेठावला, मात्र आतून काेणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरलेल्या प्रियकराने तत्काळ पाेलिस आणि गायत्रीच्या कुटुंबीयांना माहिती दिली. लकडगंज पाेलिसांनी घटनास्थळी पाेहाेचून दरवाजा ताेडला, तेव्हा गायत्री गळास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी लकडगंज पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली असून, पाेलिस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.