पीडिताचा उपचारादरम्यान मृत्यू
पुसद,
Assault: Four arrested काकडदाती येथे एका इसमाला नग्न करून हात-पाय दोरीने बांधत बेदम मारहाण केल्याची थरकाप उडवणारी घटना बुधवार, १ एप्रिल रोजी घडली होती. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सखाराम हुलकाने (वय ४०, श्रीरामपूर) यांचा तीन दिवसांच्या उपचारानंतर शनिवार, एप्रिल रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाचा चुलत भाऊ शिवानंद शंकर हुलकाने यांनी दिलेल्या तक‘ारीनुसार, काकडदातीचे विठ्ठल नागोराव भाकरे, वैभव विठ्ठल भाकरे, प्रशांत उर्फ पवन विठ्ठल भाकरे आणि बोरी खुर्दचे योगेश उत्तम भाकरे यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवानंद हुलकाने यांना फोनवरून माहिती मिळाली की, काकडदाती येथील कृष्ण मंदिराजवळ विठ्ठल भाकरे याच्या घरासमोर त्यांचा चुलत भाऊ सखाराम याला काही जण मारहाण करीत आहेत. त्यानुसार शिवानंद हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले असता सखारामला हात-पाय दोरीने बांधून नग्नावस्थेत रस्त्यावर टाकण्यात आले असल्याचे दिसून आले. त्यावेळी विठ्ठल भाकरे, भाकरे, पवन भाकरे व योगेश उत्तम भाकरे हे तेथे उपस्थित होते. यापैकी विठ्ठल भाकरे हा पाईप, चापट, लाथा-बुक्क्यांनी सखारामला मारहाण करीत असल्याचे तक‘ारीत नमूद आहे. शिवानंद यांनी सखारामला कपडे घालून श्रीरामपूर येथे घरी आणले.
Assault: Four arrested यावेळी सखारामच्या शरीरावर गंभीर जखमा असल्याने त्यांना संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान पुसदच्या मेडिकेअर रुग्णालयात दाखल आले. डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत त्यांना नांदेडला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना प्रथम निर्मल हॉस्पिटल व नंतर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पुसद शहर डीबी पथकाने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली असून पुढील सपोनि गोपाळ इंद्राळे व त्यांचे पथक करीत आहे. दरम्यान, या अमानुष मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.