पाेलिसांच्या बंदाेबस्तात चिमुकल्यावर अंत्यसंस्कार

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- नागरिकांमध्ये राेष : जवळपास दीडशे पाेलिसांचा बंदाेबस्त

अनिल कांबळे
नागपूर, 
गिट्टीखदानमधून निघालेल्या हनुमान जयंतीच्या शाेभायात्रेतून Atharva Nanare: Kidnapping-murder case अपहरण करुन खून करण्यात आलेल्या अथर्व नानाेरे याच्यावर आज तणावपूर्ण वातावरणात मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान अथर्वच्या घरापासून ते घाटापर्यंत पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त हाेता. मेडिकल रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर अथर्वचा मृतदेह गिट्टीखदान येथील घरी आणण्यात आला. आपल्या मुलाचा मृतदेह बघून कुटुंबीयांचा आक्राेश उसळला. परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मानकापूर, अंबाझरी, काेराडी या पाेलिस ठाण्यांचा माेठा बंदाेबस्त तैनात करण्यात आला हाेता.
 
 
murder
 
पाेलिसांच्या कडेकाेट बंदाेबस्तात अथर्वची अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीतही दंगा नियंत्रण पथक आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. शाेकाकुल वातावरणात अथर्वला अखेरचा निराेप देण्यात आला. मात्र उपस्थित प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न हाेता ‘या निष्पाप मुलाचा दाेष तरी काय?. या प्रकरणाचा तपास पाेलिस सर्व अंगांनी करत आहेत. आर्थिक व्यवहार, मालमत्तेचे वाद तसेच वैयक्तिक संबंध या बाबींची चाैकशी सुरू आहे. अथर्व एखाद्या परिचितासाेबतच शाेभायात्रेतून गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. माेबाईल लाेकेशन आणि काॅल डिटेल्स तपासल्या जात असून काही जवळच्या व्यक्तींवरही संशयाची सुई िफरत आहे.
हत्याकांडाची क्रूरता
भरतवाडा पुलाजवळ अथर्वचा मृतदेह दाेन पाेत्यांमध्ये काेंबून ठेवलेला आढळून आला. दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पाेलिसांना माहिती दिली. मृतदेहाची अवस्था अत्यंत भीषण हाेती. हात-पाय बांधलेले, डाेक्यावर मारहाण झाल्याचे चिन्ह आणि गळा दाबल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. खूपच क्रूरपणे अथर्वचा खून केल्याचे लक्षात येते. गळ्यातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.

धक्कादायक घटनाक्रम
Atharva Nanare: Kidnapping-murder case  हनुमान जयंती निमित्त काढलेल्या शाेभायात्रेत सहभागी झाल्यानंतर अथर्व गुरुवारी अचानक बेपत्ता झाला हाेता. कुटुंबीयांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली हाेती आणि शुक्रवारी आंदाेलनही केले हाेते. मात्र, शनिवारी त्याचा मृतदेह सापडल्याने प्रकरणाला गंभीर वळण लागले. अथर्वचे वडील दिलीप नानाेरे यांना आपल्या मुलाच्या मृत्यूचा जबर धक्का बसला आहे. ‘आमचे काेणाशीही वैर नव्हते, मग माझ्या मुलासाेबतच असे का झाले?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संतापाचा उद्रेक, बाजारपेठा बंद
हत्याकांडाच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नाेंदवला, काही ठिकाणी रास्ता राेकाे आंदाेलन करण्यात आले, तर अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली. आजही अंत्ययात्रेदरम्यान काही युवकाकडून परिसरातील दुकाने बंद करण्यात आले हाेते.