हात-पाय बांधलेले, पोत्यात मृतदेह…

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Atharva Nanore Murder Case शहरात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेदरम्यान बेपत्ता झालेला १४ वर्षीय अथर्व नानोरे याचा मृतदेह गिट्टीखदान परिसरातील भरतवाडा भागात आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व शोभायात्रेत सहभागी झाल्यानंतर अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र काहीच सुगावा लागला नव्हता. दरम्यान, पोलिसांना भरतवाडा येथे एका पोत्यात गुंडाळलेला मृतदेह सापडला. तपासात तो अथर्वचा असल्याचे निष्पन्न झाले.

Atharva Nanore Murder Case 
 
मृतदेहाची स्थिती अत्यंत संशयास्पद होती. त्याचे हात-पाय काळ्या कापडाने बांधलेले होते आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. Atharva Nanore Murder Case  यामुळे ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, या प्रकरणामागील कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.