नागपूर
Baba Jumdevji मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या १०५ वा.जन्मदिवस निमित्त बाबांचे उगमस्थान टिमकी येथील अधिष्ठानावरील बाबांच्या प्रतिमेचे पूजन :परमात्मा एक सेवक गट क्रमांक १० हावरापेठ मधील सेवक- साठवणे पुष्पकला भंडारचे प्रोप्रायटर गणेश साठवणे यांनी बाबांच्या प्रतिमेला माल्याअर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आश्रमचे अध्यक्ष रमेश ठुबरीकर प्रामुख्याने उपस्थित होते.बाबांनी आयुष्यभर अंधश्रद्धा,मानव जिवनाची जनजागृती,दु:खी कष्टी सेवकांचे दु:ख दूर करण्याचे निरंतर कार्य करीत राहिलेत. लाखो सेवक त्यांच्या सांगितलेल्या मार्गाने चालून आज आनंदमय जिवन जगत आहेत. Baba Jumdevji अस्या महान त्यागी परमपूज्य परम्यातम्याला अक्षय साठवणे, संजय बोरकर, अभिजित साठवणे, प्रियंका श्रावणकर, डिंपल साठवणे, ललीता बोरकर, काजल साठवणे, चिन्मयी बोरकर, अभिषेक श्रावणकर यांनी सुध्दा बाबा जुमदेवजीच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. आणि उपस्थिताना जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देऊन आईस्क्रीम फ्रुटी पाकीटचे वाटप करण्यात आले.
सौजन्य: रमेश मेहर, संपर्क मित्र