केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नितीन गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ
स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच
नागपूर,
मुलामुलींच्या या राष्ट्रीय boxing tournament बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वच खेळाडूंना एक सर्वोत्तम व्यासपीठ मिळाले आहे. या क्रीडा स्पर्धेत प्रत्येक खेळाडूंनी खुप मेहनत घ्यावी आणि आपल्या देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. सिव्हिल लाइन्सच्या आमदार निवास येथे राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव प्रमोद कुमार, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष राहुल शेवाळे, उपाध्यक्ष रणजीत सावरकर , राकेश तिवारी, मिलन वैद्य, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार कृपाल तुमाने,माजी मंत्री दीपक सावंत, संजय निरुपम, मनीषा कायंदे, किरण पांडव, देवांग आणि अर्जुन अवॉर्ड विजेते गोपाल देवांग यांची उपस्थिती होती.
boxing tournament स्पर्धेचा शुभारंभ प्रसंगी गडकरी म्हणाले, ही स्पर्धा केवळ राष्ट्रीय पातळीपुरती मर्यादित नाही, तर येथूनच उत्कृष्ट खेळाडूंची निवड होऊन ते पुढे ताश्कंद येथे होणार्या आशियाई स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहेत.नागपुरात आम्ही खासदार चषकाच्या माध्यमातून ६५ विविध खेळांना प्रोत्साहन देत आहोत. मुख्यत: बॉक्सिंगसारखा दमदार खेळही त्यात महत्त्वाचा भाग आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच क्रीडा मैदान केल्या जात आहे. देशभरातून आलेल्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत गडकरी पुढे म्हणाले, मला सुध्दा खेळाची खुप आवड असल्याने बॉक्सिंगचे ग्लोव्हज परिधान करून स्टेजवरूनच तुम्हा सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठीच येथे उपस्थित झालो आहे. नितीन गडकरींच्या या वक्तव्याने खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. विशेष म्हणजे, गडकरी यांच्या या प्रतीकात्मक कृतीने आणि संदेशाने खेळाडू व प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये १७ वर्षाखालील मुलामुलींचा समावेश असून या राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपला आज एक वेगळीच उंची मिळाली आहे.
पहिल्या दिवसाचे निकाल.... — मुलींचा दमदार खेळ
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुलींच्या विविध वजनगटात जबरदस्त सामने पाहायला मिळाले.
४६ किलो वजन गट:
फातिमा (लदाख), अंजली (झारखंड), नवरीत (पंजाब), राखी (हरियाणा), हीलांग (अरुणाचल प्रदेश), लावण्या (गोवा), इशिका (महाराष्ट्र) यांनी पुढील फेरी गाठली.
४८ किलो वजन गट:
अलीम (अरुणाचल खुशवीर (पंजाब), नीती (चंदीगड), सिया (आसाम), निशाली (डडउइ), अंजली (बिहार), खुशी (उत्तराखंड) विजयी ठरल्या.
५० किलो वजन गट:
अनिता (राजस्थान), प्रिया (कर्नाटक), (बिहार), शेख फरीना बतुल (तेलंगणा), नैतिक (एसएससीबी ), खुशी (हरियाणा) यांनी विजय मिळवला.
५२ किलो वजन गट:
अथिना (केरळ), नीलम (जम्मू-काश्मीर), यांशिका (हरियाणा), इंदिवरा सिंग (उत्तर प्रदेश) पुढील फेरी गाठली.
५४ किलो वजन गट:
महक (चंदीगड), रितिका श्री, सोनम चोडेन (सिक्कीम), सुचित्रा देवी (मणिपूर) विजयी ठरल्या.
किलो वजन गट:
मंदिषा (आंध्र प्रदेश), साक्षी (हरियाणा), श्रावणी पाटील (कर्नाटक), अनुष्का (उत्तराखंड), अशीता (मध्य प्रदेश) यांनी दमदार विजय मिळवला.
६० किलो वजन गट:
जैनब (पश्चिम बंगाल), गणिता देवी जागृती (उत्तर प्रदेश) यांनी शानदार कामगिरी करत पुढील फेरीत प्रवेश केला.
नागपूरमध्ये बॉक्सिंगचा जल्लोष
या भव्य उद्घाटनामुळे नागपूर शहरात उत्साह शिगेला पोहोचला असून, पहिल्याच दिवसापासून खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत स्पर्धेला रंगत आणली आहे. सिव्हिल लाइन्सच्या आमदार निवास येथे ११ एप्रिलपर्यंत होत असलेल्या १७ वर्षांखालील ज्युनिअर मुलामुलींची राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत देशभरातील सुमारे ६०० तरुण बॉक्सर १८० प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक सहभागी होत आहे.