हाताेडा पाेटात मारल्याने मजुराचा मृत्यू

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- ट्रकचालकाविरुद्ध सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा

अनिल कांबळे
नागपूर, 
Death of worker ट्रकचालकाने हाॅर्न वाजविल्यामुळे चिडलेल्या एका मजुराने ट्रकचालकाला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या चालकाने मजुराच्या पाेटावर हाताेडा मारला. त्यामुळे पाेटाला गंभीर ईजा झाल्याने मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजन रंजन यादव (39) असे मृत पावलेल्या मजुराचे नाव आहे प्रवीण अरुण बागडे (30, मसाळा) असे आराेपीचे नाव आहे.
 
 
fir
 
Death of worker  राजन यादव हा बांधकामावरील मजूर असून ताे कपीलनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निर्माणाधीन इमारतीवर काम करताे. 2 एप्रिल राेजी सकाळी नऊ वाजता राजन हा सहकारी मजूर आयुष बनसाेड, कुणाल कडबे आणि गाैरव ऊईके यांच्यासाेबत कामाला जात हाेता. समतानगरातील विशाल किराणा दुकानासमाेरील राेडने हे चारही मजूर पायी कामावर जात हाेते. यादरम्यान ट्रकचालक प्रवीण बागडे हा भरधाव ट्रक घेऊन जात हाेता. ट्रकचालक जाेरात हाॅर्न वाजवत हाेता. तेवढ्यात राजन याला ट्रकची धडक बसणार ताेच गाैरव ऊईकेने त्याला हात धरुन ओढले. त्यामुळे ताे थाेडक्यात बचावला. राजनने चालक प्रवीणला थांबण्याचा इशारा केला आणि शिवागाळ केली. चिडलेल्या प्रवीणने ट्रकमधून एक हाताेडा आणला आणि राजनच्या पाेटावर मारला. या हल्ल्यात राजन खाली काेसळला. त्याच्या सहकारी मजुरांनी राजनला घरी नेले. रात्रभर त्याने त्रास सहन केला. दुसऱ्या दिवशी त्याने दवाखाण्यात जायचे असल्याचे सांगितले. कुटुंबियांना त्याला मेयाे रुग्णालयात दाखल केला. मात्र, राजनचा काही मिनिटांतच मृत्यू झाला. या प्रकरणी कपीलनगर पाेलिसांनी आराेपी प्रवीण बागडेवर सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.