धाराशिव
Dharmashiv education मुलांचा अभ्यास आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितले की, संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचे नियोजन आहे. या वेळेची सूचना गावांमध्ये भोंगा वाजवून दिली जाईल.जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतीचा यामध्ये सहभाग करून घेणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितले
शिवाय जिल्हा परिषद शाळेत पुन्हा एकदा सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला जाणार आहे. तसेच वाचन संस्कृती वाढावी यासाठी वाचन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं. या अभिनव उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा असून धाराशिवकरांकडूनही या निर्णयाचं स्वागत केल्या जात असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, या उपक्रमाद्वारे Dharmashiv education संध्याकाळी सात ते नऊ या वेळेत सर्वत्र दोन तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. त्यासाठी एका भोंग्याच्या माध्यमातून वेळ निश्चित केला जाईल. हा भोंगा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाला बसण्याची आणि पालकांसाठी टीव्ही बंद करण्याची 'अलार्म बेल' असेल. तर दुसरीकडे नुसता हा कागदावर निर्णय न घेता आणि एवढ्यावरच न थांबता, गावात शिक्षण निरीक्षक आणि ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक या दोन तासांत गावात गस्त घालेल. घरोघरी जाऊन खरोखरच टीव्ही बंद आहेत का आणि मुले अभ्यासात मग्न आहेत का, याची प्रत्यक्ष खातरजमा हे पथक करणार आहे. प्रशासनासोबतच पालकांनी देखील या उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन अर्चना पाटील यांनी केले आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी दोन तास टीव्हीचा त्याग करावा. हे केवळ प्रशासनाचे काम नसून संपूर्ण समाजाचे योगदान आहे, असेही अर्चना पाटील म्हणाल्या. या निर्णयाचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत असले तरी, घराघरातील टीव्ही बंद करण्याच्या सक्तीवर धाराशिवकर आता काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.