घराघरावर डिजिटल नंबर प्लेट्समुळे ग्रामविकासाला नवे बळ

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
घरासंबंधी सर्व माहिती मिळणार एका लिकवर
 
 सेलू, 
Digital number plates on the house मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुयातील कोटंबा ग्रामपंचायतीने एक अभिनव आणि भविष्याभिमुख उपक्रम राबवत गावात घराघरावर डिजिटल नंबर प्लेट्स लावण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमामुळे ग्रामस्थांना त्यांच्या घराशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती आता एका लिकवर उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायतीने लोकसहभाग आणि प्रशासनाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीपणे राबवला आहे. या डिजिटल नंबर प्लेट्सवर यूआर कोड देण्यात आला असून, मोबाईलद्वारे स्कॅन करताच घरमालकाची माहिती, कर विवरण, थकबाकी, तसेच घराचा फोटो सहज पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.
 
 
Digital number plates
 
Digital number plates on the house  या उपक्रमात लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला आणि कर्मचार्‍यांचा सक्रिय सहभाग लाभला असून, गावाने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विविध विकासकामांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे ग्रामपंचायतीत कर भरण्याची प्रक्रियाही सुलभ झाली असून, नागरिकांसाठी स्कॅनरची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकल्पनेच्या यशस्वी अंमलबजावणीमागे माजी सरपंच रेणुका कोटंबकर यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम प्रत्यक्षात उतरला आहे. सध्या गावात डिजिटल नंबर प्लेट लावण्याचे काम सुरू असून, भविष्यात अधिक माहिती समाविष्ट करण्याची योजना आखण्यात आली आहे. कोटंबा ग्रामपंचायतीचा हा उपक्रम ग्रामीण भागासाठी आदर्श ठरत असून, डिजिटल भारताच्या दिशेने एक ठोस पाऊल मानले जात आहे.