"अरे वेड्यांनो, होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर आम्ही तुम्हाला नरकात पाठवू"

ट्रम्प यांनी दिली इराणला मोठी धमकी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
donald-trump-threat-to-iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. त्यांनी इराणी लोकांना 'वेडे' आणि 'हरामखोर' असेही संबोधले. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणला 'होर्मुझची सामुद्रधुनी उघडा, नाहीतर आम्ही तुम्हाला नरकात पाठवू' असे आवाहन केले. ट्रम्प यांनी इराणच्या वीज प्रकल्पावर आणि पुलावर होणाऱ्या हल्ल्याची तारीखही जाहीर केली. त्यांनी मंगळवारी इराणमध्ये 'वीज प्रकल्प आणि पूल दिन' एकत्र साजरा करण्याची धमकी दिली. रविवारी एका अमेरिकन वैमानिकाच्या बचाव मोहिमेदरम्यान इराणने इस्फहानजवळ दोन सी-१३० विमाने आणि दोन ब्लॅक सी हॉक हेलिकॉप्टर पाडल्यानंतर ही धमकी देण्यात आली आहे.
 

trump 
 
 
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराणला सर्वात कठोर धमकी दिली
 
 
 
सौजन्य: सोशल मीडिया 
 
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मंगळवारी इराणमध्ये 'वीज प्रकल्प दिन' आणि 'पूल दिन' एकत्र साजरा केला जाईल. हा हल्ला असा असेल, जो आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल!!! वेड्या हरामखोरांनो, होर्मुझची सामुद्रधुनी उघडा! नाहीतर तुम्ही नरकात जाल!

फक्त बघा! स्वतःसाठी अल्लाहकडे प्रार्थना करा."