लाडकी बहीण योजनेत इ-केवायसी मुदतवाढ द्या : देवानंद पवार

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
यवतमाळ, 
E-KYC in Ladki Bhain Yojana ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्वाची व प्रभावी ठरत असली, तरी तिच्या अंमलबजावणीत अनेक गंभीर त्रुटी समोर येत आहेत. त्यातही इ-केवायसी प्रकि‘या न केलेल्या महिलांसाठी विशेष मुदतवाढ जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देवानंद पवार यांनी केली उपलब्ध आकडेवारीनुसार राज्यातील सुमारे २.५ कोटी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात असला, तरी सुमारे ३५ लाख महिला विविध कारणांमुळे अद्याप लाभापासून वंचित आहेत. विशेषतः यापैकी अंदाजे २० लाख महिलांनी इ-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यामुळे त्या योजनेपासून दूर राहण्याची शक्यता निर्माण झाली असोन ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.
 
 
devanand
 
E-KYC in Ladki Bhain Yojana यवतमाळ हीच स्थिती दिसून येत असून, सुमारे ५.५ ते ६ लाख लाभार्थ्यांपैकी अंदाजे १ ते १.२ लाख महिला सध्या लाभापासून वंचित आहेत. त्यापैकी जवळपास ७० हजार महिलांनी इ-केवायसी प्रक्रिया केलेली नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी ३१ मार्चपर्यंत दिलेली मुदतवाढ आणि सध्या ३० एप्रिलपर्यंत दिलेली मुदतवाढ या दोन्ही केवळ त्रुटी दुरुस्तीसाठी पुरेशा ज्या महिलांनी इ-केवायसी प्रकि‘याच केलेली नाही, त्यांच्यासाठी कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाही. ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांना तांत्रिक माहितीचा अभाव, आवश्यक साधनांची कमतरता, इंटरनेट सुविधेचा अभाव तसेच स्थानिक स्तरावर योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांनी वेळेत प्रकि‘या पूर्ण केलेली नाही. या वास्तवाकडे महिला व बालकल्याण विभागाने गांभीर्याने लक्ष दिलेले दिसत नाही. व बालकल्याण विभागाच्या भोंगळ कारभारामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली असून, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणारी ही महत्वाकांक्षी योजना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.