मारेगावात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
स्थानिक रहिवासी आक्रमक
प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम

मारेगाव, 
Encroachment in Maregaon मारेगाव नगर पंचायत अधिनस्त गट क्रमांक २८० मधील गावठाण, भूदान व अनधिकृत लेआऊट क्षेत्रातील व व्यावसायिक अतिक‘मण नियमित करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या मुदतीत कार्यवाही न झाल्यास तीव‘ आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मागील ५० वर्षांपासून या भागात नागरिक वास्तव्यास असून अनेकांनी व्यावसायिक उपक्रमही सुरू केले आहेत. संबंधित अतिक्रमकांनी मारेगाव तहसील कार्यालय, नगर पंचायत, तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय येथे २०११ पूर्वीच्या पुराव्यांनिशी ऑनलाईन व ऑफलाईन प्रस्ताव सादर केले होते.
 
 
maregav
 
मात्र, मागील अनेक वर्षांपासून हे प्रस्ताव प्रलंबितच असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या मंत्रीमंडळाचा निर्णय, तसेच महसूल व वन विभागाच्या ताज्या शासन निर्णयानुसार अतिक्रमकांच्या नियमानुकूल करण्याची स्पष्ट तरतूद असूनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला
 
 
Encroachment in Maregaon  याबाबत तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, येत्या ८ दिवसांत अतिक्रमण नियमित करण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल न झाल्यास तीव‘ आंदोलन छेडले जाईल. तसेच उद्भवणार्‍या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देण्यात आहे. निवेदन देताना प्रशांत नांदे, अनूप महाकुलकर, मंजूषा बोढाले, शोभा नक्षणे, दुष्यंत निकम, अनिकेत चोपणे, मिलिंद राऊत, विराज पोटफोडे, प्रफुल उरकुडे, फैजान शेख, सलमान शेख, सुनील परचाके, अविनाश राऊत यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.