स्वच्छ, सुंदर बस स्थानकात गणेशपेठ बस स्थानक

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
गणेशपेठ बस स्थानकाची समितीकडून पाहणी

नागपूर, 
Ganeshpeth Bus Station हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत पुण्याच्या समितीकडून गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. यात प्रामुख्याने स्वच्छ, बस स्थानकात गणेशपेठ बस स्थानकाला समितीने चांगले गुण देत समाधान व्यक्त केले. गणेशपेठ बस स्थानकाच्या पाहणी दौर्‍यात प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती ४ च्या अमृता ताम्हणकर, प्रादेशिक अभियंता रमेश कांबळे, अखिलेश गणवीर, जोश्ना करवटकर यांनी गणेशपेठ स्थानकाची पाहणी केली.
 
 
ganeshpeth-one
 
Ganeshpeth Bus Station  प्रवाशांचे प्रतीक्षालय, स्थानक व परिसराची स्वच्छता, शौचालय, चालक-वाहकांचे विश्रातीगृह, पिण्याच्या पाण्याची कॅन्टीन आदी बस स्थानकाची पाहणी करण्यात आली. पाहणी केल्यानंतर समितीकडून त्याचा अहवाल मुख्यालयाला सुपूर्द करण्यात येणार आहे. गणेशपेठ स्थानकाच्या स्वच्छतेबाबत आणि सुविधेबाबत समितीच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान ही महामंडळाची एक स्पर्धा आहे. ती राबविली जाते. बस स्थानके स्वच्छ, सुस्थितीत व प्रवाशांसाठी सोयीस्कर करणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. स्पर्धेतून स्वच्छता, शौचालय व्यवस्था, परिसराची देखभाल, प्रवासी सुविधा यावर आधारित मूल्यमापन केले जाते. शहर, अर्धशहरी आणि ग्रामीण अशा विभागांमध्ये स्थानकांचे वर्गीकरण करून स्पर्धा घेतली जाते. उत्कृष्ट स्थानकांना प्रोत्साहनपर १ रुपयांपर्यंत पारितोषिके देण्याची तरतूद आहे.