कारंजा (घा.),
येथील Gurukul Public School गुरुकुल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या विकासासाठी तसेच विद्यार्थी केंद्रीत शिक्षण प्रणालीचे विविध टप्प्यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेला डॉ. राजेंद्र मिश्रा, संस्थेचे अध्यक्ष शरद बोके, संस्थेचे सचिव अजय भोकरे, मुख्याध्यापक आशिष मानकर, पर्यवेक्षक पसंत बारंगे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
Gurukul Public School सदर कार्यशाळा मार्गदर्शक डॉ. राजेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यशाळेमध्ये आनंदी वर्ग, कृतीशील विद्यार्थी, कम्युनिकेशन तसेच एक उत्कृष्ट शिक्षक या विविध विषयावर डॉ. मिश्रा यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेमध्ये विशेष एनसीएफ आणि एनइपी या शिक्षण प्रणालीवर विशेष दृष्टिकोन ठेवून मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे सर्व पदाधिकारी गुरुकुल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना नवे तर आपल्या शाळेतील प्रत्येक शिक्षक सर्व गुणसंपन्न, प्रत्येक क्षेत्रात विकसित व्हावा, याकरिता नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांकरिता आयोजित करीत असतात.