महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मेसीचा घवघवीत निकाल

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
- गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

गोंदिया, 
Maharashtra College of Pharmacy Result डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोनेरे (मुंबई) तर्फे घेण्यात आलेल्या बी.फार्मेसी ( तिसर्‍या व पाचव्या सेमिस्टर) परीक्षेचा शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून खमारी येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मेसीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा तृतीय सेमिस्टर (द्वितीय वर्ष) निकाल ८३.३३ टक्के तर पाचव्या सेमिस्टरचा (तृतीय वर्ष) निकाल ८१.४२ टक्के इतका लागला असून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
 
 
nikal
 
Maharashtra College of Pharmacy Result  तृतीय सेमिस्टरमध्ये कृपा नागपुरे (सीजीपीए ९.०) हिने प्रथम क्रमांक मिळवला. वैष्णवी गुजर (सीजीपीए ८.९१) हिने द्वितीय, तर प्रीती दमाहे (सीजीपीए ८.८३) हिने तृतीय क्रमांक पटकावला.पाचव्या सेमिस्टरमध्ये रुचिता कोल्हे (सीजीपीए ८.६२) हिने प्रथम क्रमांक मिळवला. जाह्न वी बिसेन, अश्विनी बिसेन आणि टीना पटले (सीजीपीए ८.१५) यांनी संयुक्तरीत्या द्वितीय क्रमांक मिळवला. अनिकेत साखरे (सीजीपीए ८.०) याने तृतीय क्रमांक मिळवला. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. संदीपकुमार अग्रवाल, आयक्यूएसी समन्वयक दिलीप कुमार कटरे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक देवेंद्र पीसे यांनी अभिनंदन केले आहे.