जिपच्या २८ विद्यार्थ्यांची नवोदय प्रवेश परीक्षेत भरारी

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
Navodaya entrance exam: Success जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी यावर्षी नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावीच्या निवड चाचणीमध्ये दमदार कामगिरी केली आहे. यावर्षी ८० पैकी २८ विद्यार्थी केवळ जिल्हा परिषद शाळांतील आहे. यामध्ये पंचायत समिती हिंगणघाट मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोणा या एकाच शाळेतून ९ विद्यार्थ्यांची निवड होण्याचा विक्रम सुद्धा या शाळेने केला आहे. सदर शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण व अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी केले आहे.
 
 
zp wardh
 
Navodaya entrance exam: Success जिल्हा परिषद शाळांचे गुणवत्तेत पाऊल पुढे पडत असल्याचे या निकालावरून दिसून येत आहे. वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करून शैक्षणिक गुणवत्तेकरिता पुढाकार घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या प्रेरणेने जिल्हा परिषद शाळा कात टाकत आहे. निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याची महाराष्ट्रात सद्यस्थिती सुधारत असून सर्व शाळा निपुण होण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा कल सुद्धा वाढला असल्याचे शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांनी कळविले आहे.