मृत पायलच्या कुटूंबीयांचे आ. बडोलेंनी केले सांत्वन

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव, 
मोरगाव (अर्जुनी) येथील पायल वामन शहारे हिचा कालव्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नुकतीच घडली. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शहारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अत्यंत वेदनादायी प्रसंगी आमदार Rajkumar Badole राजकुमार बडोले यांनी ३ एप्रिल मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
 
 
badole
 
Rajkumar Badole  यावेळी त्यांनी दुःखी कुटुंबीयांच्या भावना जाणून घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.कु. पायलच्या अकाली निधनामुळे कुटुंबियांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या दुःखद प्रसंगी आमदार बडोले यांनी कुटुंबीयांना धीर देत, अशा कठीण काळात आपण त्यांच्या पाठीशी असल्याची भावना व्यक्त केली.या भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांनीही पायलच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. परिसरात या घटनेबद्दल शोकभावना व्यक्त होत असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी जि.प.सदस्य यशवंत गणवीर, पंचायत समिती सदस्य होमराज पुस्तोळे, नगरपंचायत सभापती दानेश साखरे, खरेदी विक्री समिती उपाध्यक्ष विजय कापगते,अर्जुनी मोर.भाजपा तालुका अध्यक्ष राधेश्याम भेंडारकर, दादा जोशी, नाना शहारे,संतोष मेश्राम, मृतकाचे कुटुंबिय, नातलग,व ग्रामस्थ उपस्थित होते.