पुण्यात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
ज्योती राठोड पुरस्काराने सन्मानित

यवतमाळ, 
Rajya adarsha shikṣhak puraskar शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा मानाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा पुणे येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात यवतमाळ जिल्ह्यातील उपक‘मशील शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यंदाच्या सोहळ्यात आर्णी येथील उपक‘मशील शिक्षक ज्योती गोविंद राठोड (चव्हाण) यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
 
jyoti
 
ध्येय एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात राज्याचे आयडॉल शिक्षक दत्तात्रय वारे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या शिक्षक, शाळा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यवतमाळ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत, साधन व्यक्ती सुलोचना भीमराव राऊत, बाभुळगाव येथील विलास थेते, पांढरकवडा येथील अविनाश काकडे, पुसद येथील महेश चव्हाण, यवतमाळ येथील अर्चना वासेकर तसेच वणी येथील मीनल बेझलवार यांनाही राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
 
Rajya adarsha shikṣhak puraskar  तसेच उत्कृष्ट शाळा म्हणून कळंब तालुक्यातील येथील जिल्हा परिषद शाळेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. या शाळेचे मुख्याध्यापक अमोल पालेकर व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेद्वारे सुमारे १८ लाख २७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. या कार्यक‘माला संस्थेचे अध्यक्ष सुदाम शेंडगे, सचिव अर्चना शेंडगे, उपजिल्हाधिकारी शुभम उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर उपस्थित होते. या उपक‘मामुळे शिक्षकांना प्रेरणा मिळून शैक्षणिक व सामाजिक कार्याला चालना मिळते, असे मत वारे गुरुजी यांनी व्यक्त केले. दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.