केद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडे शिवसेनेची मागणी
मानोरा,
Strengthen health care वाशीम जिल्ह्याचा समावेश निती आयोगाने देशातील ११२ मागास जिल्ह्यांमध्ये केला असून, जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव आहे. विशेषतः मानोरा तालुयातील भौगोलिक परिस्थिती आणि वाढती लोकसंख्या पाहता, येथील आरोग्य यंत्रणा सक्षम करणे काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर मानोरा तालुयातील आरोग्य उपकेंद्रांत आवश्यक निधी व साधनसामुग्री उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे शिवसेना (शिंदे गट) पदाधिकार्यांनी केली आहे.
१ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन वाशीम जिल्ह्याची निर्मिती झाली. मात्र, निर्मितीनंतरही शिक्षण, कृषी आणि आरोग्य या मूलभूत क्षेत्रांत जिल्हा आजही मागेच आहे. मानोरा तालुयातील ग्रामीण भागात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे रुग्णांची मोठी हेळसांड होत आहे. गंभीर आजार किंवा आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर उपचार मिळत नसल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. केवळ नवीन उपकेंद्रेच नव्हे, तर तालुयातील अस्तित्वात असलेल्या जुन्या आरोग्य केंद्रांची अवस्थाही बिकट आहे. अनेक केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री आणि मनुष्यबळाची कमतरता आहे. या केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पदाधिकार्यांनी चर्चेदरम्यान केली.
Strengthen health care केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करताना शिवसेनेचे मानोरा तालुका प्रमुख डॉ. दीपक करसडे, उपजिल्हा प्रमुख श्रीधर ठाकरे, राजू ठाकरे, युवासेना तालुका प्रमुख अबर मोढे, उप तालुका प्रमुख प्रशांत भदाडे, विनोद राठोड, भिमराव राठोड, दादाराव ठाकरे आदी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नावर तातडीने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.