काटा येथे सर्वत्र हळहळ
वाशीम,
suicide तालुयातील काटा येथे तीन दिवसात दोघांनी गळफा लावून आपली जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर असे की, तालुयातील काटा येथे ३ एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान भानुदास टाले (ंवय अं. ४०) याने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
suicide या घटनेने सर्वत्र गावात हळहळ व्यक्त होत असतांनाच ४ एप्रिल रोजी रात्री दरम्यान चैतन्य शदर माळेकर अंदाजे वय अंदाजे २० वर्षे याने स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर दोन्ही आत्महत्याग्रस्त हे शेतकरी कुटूंबातील आहेत. दोन्ही मृतकांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. महसूल व पोलिस प्रशासनाने घटनास्थळांचा पंचनामा केला. भानुदास टाले व चैतन्य माळेकर यांच्या आत्महत्येने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
छायाचित्र - भानुदास टाले, चैतन्य माळेकर