तृणमूलच्या पापाचा घडा भरला : पंतप्रधान

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
कूचबिहार
West Bengal पश्चिम बंगालमधील भ्रष्टाचार, घुसखोरी आणि महिलांवरील अत्याचारामुळे जनता भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात लोटली जात आहे. तृणमूलच्या पापांचा घडा आता भरून ओसंडून वाहू लागला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
pm modi 
West Bengal  ते रविवारी कूचबिहार येथे एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. पंतप्रधान म्हणाले, तृणमूलच्या राजवटीत लोकशाही कमकुवत झाली आहे आणि घटनात्मक संस्थांची उपेक्षा केली जात आहे. आगामी निवडणुकीनंतर भ्रष्टाचाèयांवर कठोर कारवाई केला जाईल. त्यांच्याकडून प्रत्येक गैरकृत्याचा हिशेब घेतला जाईल.
West Bengal  ही निवडणूक तुमच्या मुलांचे भविष्य निश्चित करणारी ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करा. तुमच्या कुटुंबासाठी मतदान करा. भाजपाला मतदान करून, परिवर्तनावर शिक्कामोर्तब करा. निवडणूक आयोग यावेळी निवडणुका निष्पक्षपणे पार पाडेल, असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.