मुंबई
Uday Samant राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी महत्त्वपूर्ण भेट रविवारी सकाळी पार पडली. शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली.
सामंत यांनी सांगितले की, ही भेट प्रामुख्याने नाट्य परिषदेच्या बैठकीसंदर्भात होती. तसेच, अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट झालेली नव्हती, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली.
बारामती विधानसभेच्या Uday Samant संभाव्य पोटनिवडणुकीबाबत बोलताना सामंत यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे त्यांनी नमूद केले. राजकारणापेक्षा मानवी संवेदनांना प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित करत, सुनेत्रा पवार निवडणूक लढवत असतील तर ती बिनविरोध व्हावी, ही सर्व पक्षांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांवर भाष्य करण्यास टाळाटाळ केली, मात्र काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले असल्याचे सूचित केले. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आणि संस्कार जपण्याची गरज व्यक्त करत, अशा निर्णयातून देशभरात सकारात्मक संदेश जाईल, असेही ते म्हणाले.दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवरही सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, संबंधित प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. पत्रकार परिषद कोणी घेतली, कागदपत्रे कोणी सादर केली, याचा तपास झाला पाहिजे. केवळ आरोप-प्रत्यारोपांमुळे सरकारच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, उलट मुख्यमंत्री शिंदे यांच्याबद्दल जनतेत सहानुभूती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, या भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, बारामती पोटनिवडणुकीसंदर्भात पुढील भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.