अवकाळी पावसामुळे राज्यात हाहाकार

२९ जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पिकांना फटका

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
मुंबई
Unseasonal rains गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने राज्याला झोडपून काढले आहे. कृषी विभागाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना निसर्गाच्या या प्रकोपाचा फटका बसला असून सुमारे 2 लाख 4 हजार ८३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात नाशिक, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव या चार जिल्ह्यात सर्वाधिक हानी झाली आहे.
 
rain 
Unseasonal rains १४ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत झघलेल्या पावसामुळे केळी, गहू, मका, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, कलिंगड, डाळिंब, कांदा, संत्रा आणि द्राक्ष या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पूर्णपणे कोलमडून गेला आहे.
जिल्हानिहाय नुकसानीचा आढावा
Unseasonal rains यवतमाळ : जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १४  गावात १९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पाच घरांची पडझड झाली आहे.
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरात वादळी वाèयासह गारपीट झाली. घरांवरील छप्परे उडाली असून शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.
नंदूरबार : जिल्ह्यातील ६२ गावांमधील ९५४ शेतकèयांच्या ८३२ हेक्टरवरील ज्वारी, मका आणि कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : गेल्या १४  दिवसात जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली असून सुमारे १८ हजार शेतकऱ्याना याचा फटका बसला आहे.
नाशिक : निफाड आणि येवला तालुक्यातील द्राक्ष बागांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षांना तडे गेल्यामुळे व्यापाèयांनी खरेदी नाकारली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे  लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
पंचनाम्याचे आदेश, मदतीची प्रतीक्षा
Unseasonal rains एनडीआरएफच्या निकषानुसार, ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकèयांना भरपाई दिली जाणार आहे. महसूल आणि कृषी विभागाला पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
 
 
Unseasonal rains,  29 districts, Crops on two lakh hectares