नागपूर,
Vocational Training Centre महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग भवन आणि अकॅडमी ऑफ महाराष्ट्र संशोधन, व प्रशिक्षण प्रबोधीनी (अमृत) यांच्या संयुक्त विद्यमाने देवनगर, येथील कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात डिजिटल मार्केटिंग विषयावरील उद्योजकता विकास कार्यक्रम व तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण झाले.
Vocational Training Centre यशस्वी महिला उद्योजक श्वेता सहस्रभोजनी यांच्या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी एमसीईडी-अमृत योजनांचे राज्य समन्वयक श्रीकांत कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी आनंद काळे प्राचार्या अश्विनी बुजोने, बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था, देवनगर, एमसीईडी जिल्हा प्रकल्प समन्वयक करुणा शेंडे ,कार्यक्रमाच्या आयोजक दिप्ती बन्सुले, पुष्पलता खिराडे, सौरभ झाडे एमसीईडी तसेच एमसीईडी-अमृत प्रशिक्षित यशस्वी उद्योजक उपस्थित होते. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी तन्मय चौधरी, मोनाली पौनीकर, विजय बैस, दिलीप लोहिया आदींनी परिश्रम घेतले.