पाणीपुरवठा बंद राहणार
नागपूर ,
Water supply cut off सदर फळ मार्केटजवळ अमृत ९०० मिमी व्यासाच्या फीडर मेन लाईनवर व्हॉल्व्ह बसविण्याचे कामासाठी नागपूर महानगरपालिकेने नियोजन केले आहे. महानगरपालिकेने ७ एप्रिल रोजी सकाळी १० ते ८ एप्रिल रात्री १० पर्यंत पेंचचे ३६ तासांसाठी शटडाउन ठेवण्याचे नियोजन केले असून शटडाऊनमुळे खालील क्षेत्रांमध्ये पाणीपुरवठा बाधित राहील. यात प्रामुख्याने लक्ष्मी झोन अंतर्गत गायत्री नगर, प्रताप नगर, खामला, टाकळी सीम, जायताळा, त्रिमूर्ती नगर, लक्ष्मी नगर तर धरमपेठ झोन अंतर्गत येत असलेल्या राम नगर, फुटाळा लाईन, सिव्हिल लाईन्स , सेमिनरी हिल्स , दाभा, टेकडी वाडी आणि हनुमान नगर झोन अंतर्गत चिंचभवन, ओमकार नगर, हुडकेश्वर, श्रीनगर, नालंदा नगर, नरसाळाचा समावेश आहे.
Water supply cut off धंतोली, वांजरी नगर, रेशीमबाग, हनुमान नगर तर नेहरू झोन अंतर्गत सक्करदरा, बालाजीनगर, गांधीबाग झोन अंतर्गत सिताबर्डी किल्ला, महाल, गोदरेज आनंदम, मेडिकल फीडर तर सतरंजीपुरा झोन अंतर्गत बोरियापुरा, सेंट्रल रेल्वे परिसराचा समावेश आहे. आशी नगर : नाारा , नारी , जरीपटका वस्तीचा समावेश असून मंगलवारी झोन अंतर्गत येत असलेल्या वस्तीत गिट्टीखदान, राजनगर, सदर या भागाचा समावेश आहे. शटडाउनदरम्यान पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी एक दिवसापूर्वीच आवश्यक तेवढा पाणी साठा करून ठेवावा व पाण्याचा वापर काटकसरीने करावा.