आम्हाला पैसे नको, अपघाताचे कारण जाणून घ्यायचेय

अहमदाबाद विमान अपघातातील पीडित कुटुंबांचे पंतप्रधानांना पत्र

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Ahmedabad plane crash अहमदाबादमध्ये एअर इंडिया विमान अपघातानंतर 10 महिन्यांनी, सुमारे 30 पीडित कुटुंबांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पंतप्रधानांना विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
 
ahamadabad plain crash 
Ahmedabad plane crash कुटुंबीयांनी सांगितले, आम्हाला पैसे नको आहेत. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की अपघात का झाला आणि त्यात काही तांत्रिक बिघाड होता का? कुटुंबीयांचे म्हणणे आहे की जर ब्लॅक बॉक्स डेटा सार्वजनिक केला जाऊ शकत नसेल, तर किमान तो खाजगीरित्या कुटुंबांसोबत सामायिक केला जावा.
१२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे बोइंग ७८७-८ विमान टेकऑफनंतर लगेचच मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले होते. या अपघातात २४१  प्रवासी आणि इतर १९ लोकांसह एकूण २६० लोकांचा मृत्यू झाला होता.
वेबसाइटवर मृतकांच्या सामानाचे स्पष्ट फोटो नाहीत
Ahmedabad plane crash पीडित कुटुंबांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात एअर इंडियाकडून मदतीची कमतरता असल्याचा आरोप केला. या अपघातात आपल्या आईला गमावलेल्या किंजल पटेल यांनी एअर इंडियाच्या वेबसाइटच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणींचा उल्लेख केला, जिथे पीडितांच्या सामानाची ओळख पटवावी लागते.
त्या म्हणाल्या, वेबसाइटवर २५,००० हून अधिक वस्तूंची यादी आहे, पण फोटो स्पष्ट नाहीत. त्यामुळे काहीही शोधणे किंवा ओळखणे जवळजवळ अशक्य आहे. तर, आपली आई, भाऊ आणि मुलगी गमावलेल्या खेडा येथील रोमिन वोरा यांनी सांगितले की, डिजिटल साधनांची माहिती नसल्यामुळे अनेक कुटुंबांना अडचणी येत आहेत.
Ahmedabad plane crash ते म्हणाले, फक्त एक ईमेल आयडी आहे आणि उत्तर येण्यासाठी १५ दिवसांपर्यंत लागतात. गावातील अनेक लोकांना ईमेल वापरताही येत नाही.ङ्घ त्यांनी असेही म्हटले की, वेबसाइटवर खाजगी वस्तू सार्वजनिकरित्या दाखवणे असंवेदनशील आहे.
Ahmedabad plane crash विमान अपघातात २४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर निलेश पुरोहित म्हणाले, आता माझे घर रिकामे वाटू लागले आहे. कोणतीही भरपाई ही उणीव भरून काढू शकत नाही. आम्हाला पैसे नकोत, तर सत्य जाणून घ्यायचे आहे.
जूनमध्ये विमान अपघाताचा अंतिम अहवाल येण्याची शक्यता
Ahmedabad plane crash पीडित कुटुंबांनी पत्राची प्रत एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनाही पाठवली आहे. या प्रकरणी एअर इंडियाच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने गेल्या वर्षी जुलैमध्ये विमान अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल सादर केला होता. अंतिम अहवाल या वर्षी जूनमध्ये, म्हणजेच अपघाताच्या पहिल्या वर्षपूर्तीजवळ येण्याची शक्यता आहे.