अब्रू लुटली, व्हिडीओ व्हायरल झाले!

भोंदू अशोक खरातने सर्वस्व लुटलेल्या महिला हवालदिल मानसोपचार घेण्याची वेळ

    दिनांक :05-Apr-2026
Total Views |
नाशिक
Ashok kharat विकृत भोंदू अशोक खरात याने लैंगिक अत्याचार केलेल्या अनेक महिलांची मनस्थिती सध्या प्रचंड बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशोक खरातच्या केबिनमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये अशोक खरात या महिलांशी लैंगिक संबंध ठेवताना दिसत आहे. यापैकी अनेक व्हिडीओंमध्ये महिलांचे चेहरे दिसत असून बहुतेक महिलांची ओळख उघड होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देऊनही हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. या सगळ्यामुळे पिडीत महिलांना जबर मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे. 
 
ashok kharat 
Ashok kharat  अशोक खरात प्रकरणातील आठ ते नऊ पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांची भेट घेतल्याची माहिती आहे. अशोक खरात याच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या महिला सध्या प्रचंड नैराश्याच्या भरात असून त्यांना एकटे पडल्याची भावना सतावत आहे. या प्रकरणात नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून महिलांना कोणतेही दडपण घेऊ नये, तसेच त्या पूर्णपणे सुरक्षित असल्याची ग्वाही देण्यात आली आहे. तसेच तुम्हाला न्याय नक्की मिळेल, असे आश्वासनही देण्यात आले आहे.
भोंदू अशोक खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित महिलांनी मानसोपचार तज्ञांकडे धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणात पिडीत महिलांची ओळख उघड होऊ नये, Ashok kharat यादृष्टीने खबरदारी घेण्यासोबत पोलिसांकडून या महिलांची चौकशी अज्ञातस्थळी केली जात आहे. भोंदू अशोक खरात आणि पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर पोलिसांनी थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. तसे सायबर पोलिसांकडून आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे.