जिल्हा परिषद शाळेसमोर बेकायदेशीर गर्भपात रॅकेट उघड

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
छ.संभाजीनगर,
Abortion racket exposed छ.संभाजीनगरजवळील सातारा परिसरात धक्का देणारी घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेच्या अगदी समोर बेकायदेशीर गर्भपात रॅकेट सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर, प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन सख्ख्या बहिणींसह रुग्णाच्या नवऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले, मात्र या रॅकेटची मुख्य सूत्रधार आणि जीएनएम नर्स ज्योती भीमराव पवार अद्याप फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.
 
 

Abortion racket exposed 
 
माहितीनुसार, सातारा गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर बेकायदेशीर गर्भपात होणार असल्याची शहाणी माहिती प्रशासनाला मिळाली होती. एका २३ वर्षीय विवाहित महिलेला गर्भपातासाठी तिच्या नणंद आणि नवरा घेऊन आले होते. त्याच वेळी पोलिसांचा दबा धरलेला पथक घटनास्थळी पोहोचला आणि रॅकेटचा भांडाफोड केला. ताब्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिला (सख्ख्या बहिणी) आणि एक पुरुष समाविष्ट आहेत.
 
 
प्राथमिक तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. रॅकेटची मास्टरमाइंड ज्योती पवार असून तिने अवघ्या पंधरा हजार रुपयांमध्ये पोर्टेबल मशीन वापरून गर्भलिंग तपासणी सुरू केली होती. गर्भ मुलीचा असल्यास गोळ्या देऊन गर्भपात केला जात होता. तर, महिलांची प्रकृती किंवा परिस्थिती पाहता, त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवून लाखो रुपये उकळवले जात असल्याचेही निष्पन्न झाले आहे.छापा पडल्याचे लक्षात येताच ज्योती पवार पळ काढण्यात यशस्वी झाली आणि सध्या ती फरार आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध पीसीपीएनडीटी कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शाळेसारख्या पवित्र ठिकाणासमोर घडलेल्या या घृणास्पद प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.