चेन्नई,
Actress Subashini commits suicide टेलिव्हिजनच्या विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्री सुबाषिनीने आत्महत्या करून आपले जीवन संपवले. ही घटना मालिकेच्या शूटिंगनंतर घडली. चेन्नईतील अय्यप्पंथंगल येथील खाजगी अपार्टमेंटमध्ये राहणारी सुबाषिनी मुळची श्रीलंकेची असून, ती ‘कयाल’ या लोकप्रिय मालिकेत काम करत होती. तिचा पती बंगळुरूमध्ये राहतो; मात्र शूटिंगसाठी ती अनेक वेळा घरापासून दूर राहत होती.
माहितीनुसार, रात्री अभिनेत्रीने नवऱ्यासोबत व्हिडीओ कॉलवर संवाद साधला होता. काही काळानंतर तिने आत्महत्या केली. स्थानिक स्रोतांच्या माहितीनुसार, दोघांमध्ये काही कौटुंबिक वाद सुरू होते, आणि या वादातूनच तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत आणि कुटुंबियांची चौकशी करत आहेत.