आयटक आशा संघटनेची जिल्हा परिषदेवर धडक

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
थकित मोबदला अदा करा मागणी
यवतमाळ, 
आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते ASHA Organization आशा व गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा शहीद-ए- आझम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी श्रमशक्ती भवन येथून निघालेला मोर्चा घोषणा देत शहरवासींचे लक्ष केंद्रित करत जिल्हा परिषदेवर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा कार्याध्यक्ष दिवाकर नागपुरे यांनी केले. यावेळी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यामार्फत पाठविण्यात आले.
 
 
itak
 
यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. ऑक्टोबरपासूनचा थकित मोबदला अदा करण्यात यावा, या मुख्य मागण्या करण्यात आल्या. ग्रामीण व नागरी भागातील आशा स्वयंसेविकांना संदर्भिय शासन निर्णयानुसार कोरोना काळातील प्रोत्साहनपर 1000 रुपयांप्रमाणे 22 महिन्यांची रक्कम अदा करण्यात यावी, आदी विविध मागण्या करण्यात आल्या.
 
 
 
ASHA Organization  तसेच आशा स्वयंसेवकांना ऑक्टोबर महिन्यापासून मानधन नाही, दोन दोन वर्षे वर्धनी केद्र, कुष्ठरोग सर्वेक्षण, क्षयरोगाचे काम, स्पुटम, पंतप्रधान मातृवंदन योजना यासारख्या कामाचे पैसे मिळत नाहीत. राज्य सरकारचा मोबदलासुद्धा दोन तीन महिन्यांपासून मिळाला नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा थकीत मानधन तातडीने अदा करण्यात यावे यासह इतरही मागण्या त्वरित निकाली काढाव्या. कोविड-19 च्या अनुषंगाने सर्वेक्षण करणाèया आशांनी ग्रामीण व नागरी भागात जोखीम पत्करून कोरोना काळातील काम केले असल्यामुळे त्यांना नियमित वेतन व मानधना व्यतीरिक्त 1000 रुपये 22 महिन्यांची अदा करण्यात यावी.
 
 
यावेळी सुनीता कुंभारे, विजया आत्राम, माया मरस्कोले, सुनीता सोनटक्के, राधा लिखेवार, सारिका येरमे, सविता सिडाम, अल्का राजगडकर, नितीना कुंभरे, अनिता अर्के, रेखा होले, अनिता पिंपळे, किरण कांबळ, विजया तायडे, चंदा जयस्वाल, नीता मोहळ, लीना निमकर, संध्या कातकिडे, बेबी भारती, रंजना मिटे, मीना गुढे, गंगा घुमे, पुष्पा मसराम, शमशाद पठाण हे पदाधिकारी उपस्थित होते.