अजित पवार अपघाताच्या दिवशी अशोक खरातच्या मोबाईलवर मेसेज

अंजली दमानियांचा सनसनाटी दावा

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
मुंबई/नाशिक,
ashok-kharat-ajit-pawar-plane-crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघाताच्या दिवशी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या मोबाईलवर काही मेसेज आले होते, असा सनसनाटी दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाने केला आहे. अंजली दमानियांकडे अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर डेटा होता, जो एका तृतीय व्यक्तीकडून मिळाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 

AJIT PAWAR 
 
 
अंजली दमानियाने सांगितले की, समता पतसंस्था आणि अशोक खरात यांचा अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशी आणि त्यानंतर सतत मेसेज पाठवण्याशी संबंध असल्याचे संशय आहे. त्यांनी पोलिसांकडे मागणी केली की, २७ ते ३१ जानेवारी दरम्यान अशोक खरातच्या मोबाईलवर आलेल्या मेसेजची चौकशी केली जावी.
 
अंजली दमानियाच्या पत्रकार परिषदेनंतर आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करून सीआयडीकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यांनी म्हटले की, अजित पवारांच्या अपघाताच्या आधी, दिवशी आणि नंतर समता पतसंस्थेत झालेल्या भोंदू खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास व्हायला हवा.
 
दरम्यान, भोंदू अशोक खरातच्या पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमध्ये SIT चे तीन पथक रवाना केले आहेत. कल्पना खरात फरार असून, मुलगा हर्षवर्धन उपलब्ध नाही. SITच्या तपासात कल्पना खरातची चौकशी आर्थिक व्यवहार आणि प्रकरणाशी संबंधित पुरावे मिळवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
 
या प्रकरणामुळे अजित पवारांच्या अपघाताशी अशोक खरात आणि समता पतसंस्थेचा संबंध आहे की नाही, असा संशय अधिक गडद झाल्याचे सांगितले जात आहे.