अशोक खरातवर महिला शोषणाचा गंभीर आरोप; गौतमी पाटीलने दिली प्रतिक्रिया

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नाशिक/मुंबई,
gautami-patil-reaction : भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळे कारनामे पुन्हा एकदा समोर आले आहेत. महिला लैंगिक शोषणापासून आर्थिक फसवणूक आणि हवाला रॅकेटपर्यंत, त्याच्या गुन्ह्यांचा गुंडाळा उघड झाला आहे. यावर प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील म्हणाल्या, "अशोक खरातसारख्या व्यक्तीवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे. या प्रकारामुळे इतरांना धडा मिळावा आणि भविष्यात अशा घटना टाळता याव्यात."

gautami-patil-reaction
 
 
 
तपासात समोर आले आहे की, खराताने समता नागरी पतसंस्थेत 100 खाती उघडून सुमारे 60 कोटींचा व्यवहार केला. त्याचबरोबर, मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून ‘हवाला रॅकेट’ चालवला जात होता, ज्यासाठी विशेष सूट वर्षभर बुक ठेवली होती. या हॉटेलच्या रूमद्वारे कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार राबवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ईडी या प्रकरणाचा तपास करणार असून, सहभागी कुणालाही सोडणार नाही. पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी अशोक खरातच्या अनेक मालमत्ता, बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे महिला शोषण आणि आर्थिक घोटाळ्यांविरोधातील प्रशासनाची कडक भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे.