दक्षिणेचे संकेत

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
अग्रलेख...
Assembly elections  स्थानिक स्वराज्य संस्था असो की विधानसभा वा लोकसभा, दक्षिण भारतात भारतीय जनता पक्षाला सातत्याने अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे. कर्नाटक वगळता केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला दक्षिणेत सतत संघर्ष करावा लागला. पक्षाचा जो काही प्रभाव होता, तो फक्त कर्नाटक राज्यातच. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना ७१ जागा जिंकल्या. लिंगायत मतदारांनी दाखविलेल्या विश्वासामुळे उत्तर कर्नाटकात घवघवीत यश प्राप्त केले. पण, ही कामगिरी केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित होती. ग्रामीण मात्र, जनता दल आणि काँग्रेसची स्थिती मजबूत होती. काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) यांनी सरकार स्थापन केले. तथापि, जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता वाढली. २००४ मध्येच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश प्राप्त करीत तब्बल १८ जागा जिंकल्या. २००८ मध्ये झालेली Assembly elections विधानसभा निवडणूक भाजपासाठी दक्षिणेतील विजयाचे द्वार उघडणारी ठरली. सरकारमधील यूपीए आघाडी सरकारमधील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येत असल्याने काँग्रेस आणि सहकारी पक्षांविषयी जनतेमध्ये चीड निर्माण झाली होती. याच पृष्ठभूमीवर कर्नाटकात भाजपासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले. मे २००८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने २२४ पैकी ११० जागा जिंकत सहा अपक्ष आमदारांच्या मदतीने दक्षिणेत पहिल्यांदा सत्ता स्थापन केली. त्यानंतर कामगिरीत चढउतार येत राहिले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी फक्त ४० जागा मिळाल्या, पण पुढच्याच म्हणजे २०१८ मध्ये भाजपाने १०४ जागा जिंकत मुसंडी मारली आणि सत्ता स्थापन केली. २०२३ च्या निवडणुकीत पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिणेत भारतीय जनता पार्टीला शून्यातून सुरुवात करावी स्वातंत्र्यानंतर बराच काळ काँग्रेसचीच सत्ता राहिल्याने कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर होते. भाजपाच्या स्थापनेनंतर शहरी भागात जम बसविण्यास प्रारंभ केला. याच आधारावर १९८९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने चार जागांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र भाजपाने कधीही मागे वळून पाहिले नाही.
 
 
elc
 
Assembly elections  दक्षिणेत कर्नाटक वगळता भाजपाला अन्य राज्यांमध्ये एकदाही सत्तेच्या जाता आले नाही. कारण, दक्षिणेतील राजकारण हे प्रादेशिकतेकडे जास्त झुकलेले असते. त्याला भाषा आणि सांस्कृतिक वादाची किनार आहेच. भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदी भाषिकांचा आणि उत्तर भारतीयांचा पक्ष असल्याचे मतदारांच्या मनावर बिंबविण्यात आले आहे. तामिळनाडूतील राजकारण सातत्याने द्रमुक आणि अद्रमुक या दोन पक्षांभोवतीच केंद्रित राहिले आहे. १९८० पासूनच्या विधानसभा आकडेवारी पाहता गेल्या ४५ वर्षांत भाजपाला कधीही दोन आकडी संख्या गाठता आली नाही. ही स्थिती फक्त भाजपाचीच आहे असे नाही. काँग्रेसलाही १९६७ नंतर तामिळनाडूत सत्ता स्थापन करता आली नाही. द्रविडी अस्मिता, हिंदी आणि हिंदुत्वाला विरोध हे तामिळनाडूतील राजकारणाचे मुख्य आधार राहिले आहेत. म्हणूनच द्रविड मुनेत्र कळघम आणि अखिल भारतीय द्रमुक हे दोन पक्षच आळीपाळीने सत्तेवर येत असतात. पेरियार ई. व्ही. रामास्वामी यांनी १९४४ मध्ये द्रविड कळघम हा पक्ष स्थापन केला. त्यांची हिंदीविरोधी भूमिका अत्यंत टोकाची होती. सी. एन. अण्णादुराई आणि पेरियार हे दोघेही कट्टर द्रविड अस्मितेला मानणारे नेते होय. पण, कालांतराने या दोन नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. यांचा तर हिंदीला कट्टर विरोध होता. त्यांनी द्रविडनाडू नावाच्या स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. तसेही दक्षिणेत सातत्याने प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व राहिले आहे. येथील मतदार अजूनही द्रविडी अस्मितेतून बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळेच दक्षिणेत काँग्रेस, भाजपासह अन्य राष्ट्रीय पक्षांना बस्तान बसविता आले नाही.
 
 
 
१९६७ पासूनची राजकारणाची स्थिती पाहता काँग्रेसला सातत्याने द्रमुकला देण्याची भूमिका घ्यावी लागली तर भाजपानेही एआयडीएमकेसोबत युती केली. गेल्या निवडणुकीत युतीत लढल्यानंतरही भाजपाला अवघ्या चार जागा मिळाल्या. या निवडणुकीत अण्णा द्रमुकसोबत युती केली असून भाजपा २७ जागांवर लढत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भारतीय जनता पक्षासाठी अनुकूल वातावरण आहे. केंद्रातील राजकीय परिस्थितीचा प्रभावही पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूतील द्वि-ध्रुवीय आहे. जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढणारे नेतृत्व निर्माण झालेले नाही. दुसरीकडे द्रमुककडे स्टॅलिन यांच्या रूपात सशक्त पर्याय उभा आहे. मात्र, स्टॅलिन यांनी हिंदी आणि हिंदुत्वविरोधी भूमिका घेतल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. थिरुप्पारकुंद्रम येथील कार्थिगल दीपम् मुद्यावरून तामिळनाडूचे राजकारण तापले होते.
 
 
Assembly elections  मदुराईजवळ टेकडीवर प्राचीन सुब्रमण्यमस्वामी मंदिर आहे. या मंदिरावर असलेल्या एका पवित्र स्तंभावर दीप लावण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. याच मंदिराजवळ दर्गा आहे. दर्गा जवळ असल्याने मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील म्हणून द्रमुक सरकारने दीप लावण्यास विरोध केला. जेथे जेथे प्राचीन मंदिरे आहेत त्याच्या आसपास मशिदी, दर्गे उभारल्याची शेकडो उदाहरणे देशभरात दिसून येतात. हे प्रकरण तामिळनाडू हायकोर्ट आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेले. दोन्ही न्यायालयांनी राज्य सरकारला फटकारताना परंपरेनुसार दीप लावण्याची परवानगी दिली. या मुद्यावरून तामिळनाडूतील राजकारण ढवळून निघाले होते. अण्णा द्रमुकने सतत दोनवेळा सत्ता स्थापन केल्यानंतर द्रमुकची सत्ता आली. २३ एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील वातावरण पाहता अद्रमुक-भाजपा युतीचे सरकार येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. केरळ हे आणखी सागरी किनारी असलेले राज्य, जेथे भाजपाला कठोर परिश्रमाला सामोरे जावे लागत आहे. येथील राजकारण हे हिंसक प्रवृत्तीचे आहे. विरोधकांना जिवानिशी संपविण्याचे प्रयत्न अनेकदा झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. केरळमध्ये मुस्लिम ख्रिश्चनांची एकत्रित लोकसंख्या ४५ टक्क्यांच्या जवळ आहे. हिंदू ५४.७० टक्के आहेत. लोकसंख्येची ही आकडेवारी २०११ च्या जनगणनेनुसार आहे. २००१ ते २०११ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर १२.२३ टक्के एवढा होता. हिंदूंचा २.२३ तर ख्रिश्चनांचा १.३८ टक्के एवढा होता. हीच दरवाढ कायम राहिली असल्यास पूर्वोत्तर राज्यांप्रमाणेच केरळमध्येही हिंदूधर्मीय अल्पसंख्यक स्थितीत पोहलेले असतील. २०१६ मध्ये भाजपाचा पहिला आमदार नेमोम मतदारसंघातून निवडून आला होता. पण, २०२१ च्या निवडणुकीत भाजपाचा थोड्या मतांनी पराभव झाला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांनी इतिहास घडविला. थ्रिसूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा जवळपास पाऊण लाख मतांनी पराभव केला. केरळच्या संसदीय इतिहासात गोपी भाजपाचे निवडून येणारे पहिले खासदार ठरले. गोपी हे लोकप्रिय मल्याळम अभिनेते असून सध्या ते केंद्रात पेट्रोलियम राज्यमंत्री आहेत. २०२५ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करताना भाजपाने तिरुवनंतपुरम् महापालिका जिंकली आहे. याशिवाय २६ ग्रामपंचायती आणि दोन नगरपरिषदांमध्येही विजय मिळविला आहे. या राज्यातील मुस्लिम मतदार मुस्लिम लीग अथवा काँग्रेसला मतदान तर ख्रिश्चन हे डाव्यांच्या पाठीशी उभे राहतात. पण, हिंदू मतदार काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्यात विभागले जातात. यावेळी मात्र चित्र वेगळे दिसत असून हिंदू मतदारही जागृत होत आहेत ज्याचे परिणाम ५ मे रोजी जाहीर होणार्‍या निकालातून उमटतील, अशी आशा आहे.