खंडणीसाठीच केले हाेते अथर्वचे अपहरण

अथर्वचा गळा आवळून केला खून; तीन आराेपींना अटक

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
Atharva was kidnapped for ransom हनुमान जयंतीनिमित्त निघालेल्या शाेभायात्रेत गेलेल्या अथर्व दिलीप नानाेरे या मुलाच्या वडिलाकडून 40-50 लाखांची खंडणी वसूल करण्यासाठी ओळखीच्याच तिघांनी अपहरण केले. खंडणीची रक्कम मागण्यापूर्वीच त्यांनी अर्थवचा गळा आवळून खून केला. या हत्याकांडाचा छडा गुन्हे शाखा पाेलिसांनी लावला असून आराेपींनी हत्येची कबुली दिली आहे. जयराम गाेपाल यादव (19, रा. आयबीएमराेड, गिट्टीखदान), केतन उफर् कुणाल रमेश साहू (22, रा. कुतुबशाह मशिदीजवळ, गिट्टीखदान) आणि आयूष माेहन साहू (19, रा. शिवशंकर मंदिरासमाेर, मानकापूर) अशी मारेक-यांची नावे आहेत. पाेलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप नानाेरे हे भाजीपाल्याचे थाेक व्यापारी असून त्यांचा व्यापार पंचक्राेशित आहे. दिलीप यांना घरा बांधायचे असल्यामुळे त्यांनी पैसा जुळवला हाेता. याची माहिती मुख्य आराेपी जयराम याला हाेती. जयराम यादव याने अन्य दाेन भाजीपाला विक्रेते आयूष शाहू आणि केतन साहू यांना सांगितली.
 
 
 

kapde 
 
नानाेरेकडून 40-50 लाख रुपये उकण्याची याेजना त्यांनी आखली. त्यासाठी त्यांचा मुलगा अथर्व याचे अपहरण करायचा कट रचला. हनुमान जन्माेत्सव साेहळ्यानिमित्त गुरुवारी गिट्टीखदान परिसरात शाेभायात्रा निघाली हाेती. अथर्व नानाेरे हा तिथून बेपत्ता झाला. शाेभायात्रा संपली तरी अथर्व घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबीयांनी शाेध घेतला. मात्र, त्यांना काेणताही मागमूस लागला नाही. कुटुंबीयांनी गिट्टीखदान पाेलिसांकडे अथर्व बेपत्ता असल्याची तक्रार केली. शनिवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास, कळमेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भारतवाडा परिसरात, काेराडी-ेटरी बाह्यवळण रस्त्यावर एका बाेअरवेलमध्ये अथर्वचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला. अथर्वची हत्या केल्यानंतर, मारेकèयांनी त्याचे हात-पाय बांधले. त्याचा मृतदेह बाेअरवेलमध्ये काेंबला आणि रस्त्याच्या कडेला साेडून दिला. मृतदेह सापडल्याच्या बातमीने संपूर्ण शहर आणि पाेलिस दलात खळबळ उडाली हाेती. मात्र, पाेलिस हतबल झाले हाेते.
 
 
असे केले अपहरण
हनुमान जयंतीची शाेभायात्रा सुरू असताना कटानुसार जयराम यादवने अथर्वला आईस्क्रीम घेऊन देण्याच्या बहाण्याने शाेभायात्रेतून बाहेर नेले. जयरामने त्याला ’टाटा एस’ गाडीजवळ नेले. जिथे आयूष आणि कुणाल गाडीत बसलेले हाेते. त्या तिघांनी अथर्वला बळजबरीने गाडीत काेंबले आणि अथर्वने आरडाओरडा करू नये म्हणून त्याच्या ताेंडात कापड काेंबला. आराेपींनी गाडी गाेरेवाड्याच्या दिशेने नेली. निर्जनस्थळी नेऊन अथर्वला एका ठिकाणी बसवून खंडणीबाबत विचार करु लागले. मात्र, अथर्वच्या अपहरणानंतर गिट्टीखदान परिसरात एकच गाेंधळ उडाला.
 
 
जंगलातच केला अथर्वचा खून
अथर्वचे अपहरण करुन जंगलात नेल्यानंतर जयराम, आयूष आणि केतन यांनी खंडणीच्या पैशाबाबत चर्चा केली. तिघांचे एकमत झाले नाही. तसेच गिट्टीखदानमध्ये माेठा गाेंधळ उडाल्याची त्यांना कल्पना आली हाेती. अथर्वला जिवंत साेडल्यास पाेलिसांच्या जाळ्यात अडकण्याची त्यांना भीती हाेती. त्यांनी गळ्यातील दुपट्ट्याने अथर्वचा गळा आवळून खून केला. त्यानंतर, रात्रीच्या अंधाराचा ायदा घेत त्यांनी ती गाडी रस्त्याच्या कडेला साेडून दिली आणि ते नागपुरात परतले.
 
 
सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्याकांड उघडकीस
शाेभायात्रेच्या रस्त्यावरील सर्वच सीसीटीव्ही पाेलिसांनी तपासले. यामध्ये अथर्व शेवटचा दाेन मित्रांसाेबत आईस्क्रीम पार्लरजवळ दिसला. त्यानंतर आराेपींनी त्याला सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी नेले. तेथून त्याचे गाडीत बसवून अपहरण केले. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक टाटा एस वाहन संशयास्पदरित्या कळमेश्वरकडे जात असल्याचे दिसले. वाहनक्रमांकावरुन आयूषला ताब्यात घेतल्यानंतर हे हत्याकांड उघडकीस आले.
 
 
 
नागरिकांचे आंदाेलन
अथर्व बेपत्ता झाल्याच्या घटनेला 48 तासांचा अवधी झाल्यानंतरही पाेलिसांनी गांभीर्य न दाखवल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आंदाेलन केले. रस्ता राेकाे, दुकाने बंद करुन पाेलिसांविरुद्ध नारे-निदर्शने केली. अथर्व बेपत्ता झाल्यानंतर कुणीतरी त्याचे अपहरण केल्याचा संशय पाेलिसांना हाेता. मात्र, पाेलिसांना दाेन दिवस काेणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे गिट्टीखदानमध्ये तणावपूर्ण वातावरण हाेते.