नांदुरा शहरात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर दोन दिवशीय व्याख्यानमाला चे आयोजन !

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नांदुरा,
baliraja lecture series समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित दोन महत्त्वपूर्ण व्याख्यानांचे आयोजन ‘बळीराजा व्याख्यानमाला’च्या पहिल्या वर्षानिमित्त करण्यात आले आहे.
 
बळीराजा व्यख्यानमाला
 
 
या व्याख्यान मालेतील पहिले व्याख्यान शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात होणार असून “महात्मा फुले यांचे शेती व शिक्षण विषयक कार्य” हा विषय राहणार आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांसाठी महात्मा फुले यांच्या विचारांची उपयुक्तता या व्याख्यानातून उलगडून सांगितली जाणार आहे.
दुसरे व्याख्यान रविवार, १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत याच ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय समाजरचनेचे योगदान” या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भारतीय समाजव्यवस्था, सामाजिक न्याय आणि समानतेसाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या कार्याचा आढावा या व्याख्यानातून घेण्यात येणार आहे.
या दोन्ही व्याख्यानांसाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर उपस्थित राहणार आहेत. ते आपल्या विचारांमधून शेतकरी, विद्यार्थी आणि समाजातील विविध घटकांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणार आहेत.baliraja lecture series वरील दोन्ही दिवसी नांदुरा शहर पंचक्रोशीतील माताभगिनींनी हजारोंच्या संख्येने ऊपस्थीत रहावे असे विनम्र आवाहन
बळीराजा व्याख्यानमाला आयोजन समितीने नागरिक, शेतकरी ना करण्यात आले आहे.