बुलढाणा,
vijayraj-shinde : भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय संघटना नसून राष्ट्रहित, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर आधारित एक व्यापक चळवळ आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारधारेवर चालणारा हा भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचे कार्य करत आहे. असे प्रतिपापद भाजप जिल्हाध्यक्ष माजी आ. विजयराज शिंदे यांनी केले.
देशातील सर्वात मोठा आणि प्रभावी राजकीय पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्या भारतीय जनता पार्टी च्या स्थापना दिना निमित्त दि.६ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात स्थापना दिन साजरा करण्यात आला. भाजपा जिल्हा कार्यालय शिवालय येथे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते भाजपा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. शिवालय कार्यालयास फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती. यावेळी मोठ्या जल्लोषात भाजपा कार्यकर्त्यांनी ध्वजवंदन करत पक्षनिष्ठा आणि राष्ट्रसेवेची भावना व्यक्त केली. यावेळी पदाधिकार्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा केला आणि एकमेकांना भाजपा स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ते पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भाजपा सरकारच्या माध्यमातून देशात पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी झाली आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करत जनतेशी नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे,जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष सुभेदार अभिमन्यू करपे, दत्ता शिंदे, डॉ मधुसूदन सावळे, प्रा प्रभाकर वारे, मुकुंद देशपांडे, पंकज गायकवाड, नितीन दासार, सुभेदार अशोक किलबिले, कामगार प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, अंबादास घेवंदे, राजू खरात,संजय मोटे, मुन्ना बेगाणी, अजित गुळवे, राजेंद्र पवार, प्रदीप सोनटक्के, प्रदीप तोटे, प्रशांत बोरसे, उषा पवार, प्रा भगवान गरुडे, सचिन टेंभिकर, रर्वीं दशरथसिंग राजपूत, अनुसूचित मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर अंभोरे, संजय जुंबड, किशोर गवळी, बाळू ठाकरे यांसह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.