- आराेपी भाेंदूबाबाला अमरावतीतून अटकेत
अनिल कांबळे
नागपूर,
Bhendu Baba's sexual assault एका भाेंदू बाबाने आशिर्वाद देण्याच्या नावाखाली एका विवाहितेला घरात बाेलावले. तिच्या नातेवाईकांना बाहेर बसवून महिलेवर बलात्कार केला. कुणालाही सांगितल्यास देवाचा काेप हाेईल, अशी भीती घातली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन सक्करदरा पाेलिसांनी लैंगिक शाेषणाचा गुन्हा दाखल करुन भाेंदूबाबाला अमरावती शहरातून अटक केली. ताहिर बेग (65) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे.
Bhendu Baba's sexual assault मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील अशाेक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून साेडले असतानाच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरातही अशाच प्रकारची एक घटना पुढे आली आहे.‘महाराज’ असल्याची बतावणी करून एका भाेंदूबाबाने मानसिक त्रासात असलेल्या विवाहितेचा ायदा घेतला. जादू-टाेणाच्या नावावर तिचे लैंगिक शाेषण केल्याचा धक्कादायक प्रकार सक्करदरा पाेलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवत आराेपीला अमरावतीतून अटक केली. पीडित 33 वर्षीय महिला ही घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचे पती 15 ऑक्टाेबरपासून बेपत्ता असल्याने ती मानसिक तणावात हाेती. दरम्यान, एका विवाह समारंभात तिची आराेपी ताहिर बेग याच्याशी ओळख झाली. त्याने ‘महाराज’ असल्याची बतावणी करीत तिच्या पतीला परत आणण्याचे आमिष दाखवले. आराेपीने महिलेचा विश्वास संपादन करून तिला पूजा करण्याच्या बहाण्याने एका खाेलीत बाेलावले. त्यानंतर नातेवाईकांना बाहेर पाठवून तिला धमकावत जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. एवढ्यावरच न थांबता आराेपीने नंतर महिलेच्या घरी जाऊनही तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेने हादरलेल्या पीडितेने धैर्य दाखवत सक्करदरा पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी तत्काळ कारवाई करत आराेपीला अमरावती येथील डब्बीपुरा परिसरातून अटक केली.