भाजपाचा ४६ वा स्थापना दिन उत्साहात

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |

harda
 
वर्धा, 
BJP's 46th foundation day celebrated with enthusiasm भारतीय जनता पार्टीचा ४६ वा स्थापनादिन भाजपा वर्धा जिल्हा कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या उपस्थितीत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिलीप पाचखेडे यांच्या हस्ते धवजरोहण करण्यात आले. स्थापना दिनानिमित्त आयोजित संमेलनात ज्येष्ठ भाजपा नेते दिलीप पाचखेडे, मशानकर, दीपक जोशी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी भाजपाच्या वाटचालीचा आढावा घेत सर्व जुन्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या योगदानातूनच पक्ष मजबूत झाल्याचे सांगितले. याप्रसंगी दिलीप पाचखेडे यांनी भाजपाच्या स्थापनेच्या वेळेच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी अशोक कलोडे, श्रीधर देशमुख, निलेश किटे, वैशाली येरावार, जयंत कावळे, जयंत येरावार, विरू पांडे, प्रशांत बुर्ले, श्रेया देशमुख, नीता सूर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.