मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचा स्थापना दिन

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नागपूर,
BJP's foundation day भारतीय जनता पक्षाच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्त सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय लोकशाही आणि जनसेवेच्या प्रवासात मैलाचा ठरलेल्या या दिवसाचे औचित्य साधत, दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचा स्थापना दिन कार्यक्रम घेण्यात आला.
 
 
dayashankar-tiwari-one
 
BJP's foundation day  कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे,दक्षिण-पश्चिम समन्वयक नितीन महाजन, दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष, नगरसेवक व नगरसेविका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. आपल्या मार्गदर्शनात तिवारी त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा वारसा सांगताना, कार्यकर्त्यांनी जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. सामान्य माणसाचा विकास हेच भाजपचे ध्येय असून, प्रत्येक कार्यकर्त्याने केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावण्यात भाजपच्या कणखर नेतृत्वाचा मोठा वाटा असल्याचे संजय भेंडे यांनी केले.