अमेरिकेतून परतलेल्या एका तरुणाचा ४८ तासांच्या आत कार अपघातात मृत्यू

पुलाजवळील रस्ता नवा ‘ब्लॅकस्पॉट’

    दिनांक :06-Apr-2026
Total Views |
नाशिक,
car-accident : अमेरिकेत शिक्षण घेतलेल्या २४ वर्षीय शंतनू जयंत बुऱ्हाडे याचा घरी परतल्याच्या अवघ्या दोन दिवसांत नाशिक-गिरणारे रस्त्यावर भीषण कार अपघातात मृत्यू झाला. शंतनू आपल्या दोन मित्रांसह गंगापूर बॅकवॉटर आणि धरण परिसर फिरण्यासाठी गेला होता, परतताना गोदावरी नदीच्या पुलाजवळील 'गंमतजमंत' हॉटेलजवळ कार नियंत्रणाबाहेर गेल्याने ती झाडावर आदळली आणि चक्काचूर झाली.
 
 
NASHIK
 
 
या अपघातात शंतनू जागीच ठार झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. शंतनू हा कुटुंबातील एकुलता मुलगा असून, त्याच्या मृत्यूमुळे बुऱ्हाडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
स्थानिकांनी या पुलाजवळील वळण आणि अरुंद रस्त्यामुळे परिसर ‘ब्लॅकस्पॉट’ ठरल्याची नोंद केली असून प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नाशिक तालुका पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.