बीजिंग
US-Iran war अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे जगावर महायुद्धाचे सावट असतानाच चीन काही वेगळीच खेळी खेळण्यात व्यग्र आहे. चीनने सध्या सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याचा सपाटाच लावला आहे. या खरेदीमागे चीनचा एक गुप्त हेतू असून तो थेट अमेरिकन डॉलरला आव्हान देणारा ठरू शकतो.
US-Iran war इराण-अमेरिका युद्धाचा जागतिक पुरवठा साखळीवर आणि डॉलरच्या स्थिरतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा वेळी स्वत:ची अर्थव्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी चीन आपल्या परकीय चलन साठ्यात सोन्याचे प्रमाण वाढवत आहे. सोन्याचा साठा वाढवून चीन आपल्या चलनाला अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
US-Iran war केवळ सोनेच नाही तर चीन चांदीचीही मोठ्या प्रमाणावर साठवणूक करत आहे. चांदीचा वापर हा केवळ दागिन्यांसाठीच नाही तर सोलर पॅनल, इलेक्ट्रिक वाहने आणि सेमीकंडक्टर उद्योगात मोठ्या प्रमाणात होतो. भविष्यातील तंत्रज्ञानावर कब्जा मिळविण्यासाठी चीनने चांदीचा साठा वाढविण्याचा घाट घातला आहे.
डॉलर धोक्यात येणार?
US-Iran war जागतिक व्यापारात अमेरिकी डॉलरचे वर्चस्व कमी करण्यासाठी चीन प्रयत्नशील आहे. युद्धजन्य परिस्थितीत डॉलर कमकुवत झाल्यास, सोन्यावर आधारित अर्थव्यवस्था जास्त शक्तिशाली ठरेल, असे चीनचे गणित आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर रशियावर लादलेल्या निर्बर्धांमधून धडा घेत चीन आपली संपत्ती डॉलरऐवजी सोन्यात रुपांतरित करत आहे.